PMP Bus Sakal
पुणे

Accident : पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून तरुणीचा मृत्यू

दुचाकी घसरून भरधाव पीएमपी बसच्या चाकाखाली सापडल्याने महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दुचाकी घसरून भरधाव पीएमपी बसच्या चाकाखाली सापडल्याने महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला. माही मयूर गांधी (वय १९) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना कोथरूड परिसरात शनिवारी (ता. १६) घडली.

याबाबत पोलिस कर्मचारी अमोल नजन यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, दुचाकीस्वार मंदार नानवटी आणि सहप्रवासी माही गांधी बावधनहून कोथरूडच्या एमआयटी महाविद्यालयाकडे निघाले होते.

रस्त्यात कचरा डेपोजवळ सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकी अचानक घसरून दोघे खाली पडले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने माहीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: भोगावच्या सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा! पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई; २६ ग्राहकांसह १५ बारबाला आढळल्या

Marathi News Live Updates : पुण्यात आज MPSC विद्यार्थ्यांचा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Pune News: अतिउच्चदाब वीज वाहिनीत स्फोट, 3 लाखांवर ग्राहकांचा वीज खंडित; PMPच्या ७० बसची सेवा ठप्प, ८ मेट्रोगाड्या २२ मिनिटं जागेवरच थांबल्या

Nepal Flood: १० दिवस ढिगाऱ्याखाली, तरीही जीवंत! नेपाळमध्ये ६० वर्षीय महिलेची थरारक सुटका

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

SCROLL FOR NEXT