Accident News esakal
पुणे

Pune Accident News : येरवड्यात ट्रॅव्हल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

रुपाली अवचरे

विश्रांतवाडी : खाजगी ट्रॅव्हल बसने दिलेल्या धडकेत

दुचाकीवरील चालक चाकाखाली येऊन

जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना

येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात घडली.

राजेंद्र जगन्नाथ देसाई (वय 57 रा. स्वारगेट

पुणे) यांचा या दुर्दैवी अपघातात जागीच

मृत्यू झाला.

मागील आठवड्याभरात

शास्त्रीनगर चौकातील अपघाताची ही

दुसरी घटना आहे. येरवडा पोलिसांनी

दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री

पावणेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून

गुंजन चौकाकडून नगर रस्त्याकडे जाणारी गुंजन चौकाकडून नगर रस्त्याकडे जाणारी

ट्रॅव्हल बस क्रमांक (MH 14HG3969)

हिने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील चालक बसच्या

चाकाखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू

झाला. अचानक झालेल्या भीषण

अपघातामुळे शास्त्रीनगर चौकात वाहतूक

कोंडी झाली होती. येरवडा पोलिसांनी

तात्काळ घटनास्थळी घेऊन मृतदेह

शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात

पाठवला. मागील आठवड्यात डंपरने

दिलेल्या धडकेत दुचाकी तरुणाचा जागीच

मृत्यू झाला होता.

तर मागील पंधरा दिवसात वेगवेगळ्या अपघातात येरवड्यात चार जणांचा मृत्यू झालेला आहे. जीवघेण्या रस्ते अपघातांच्या घटना टाळण्यासाठी ठोस

उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक

नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : "कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, डेटा गोळा करण्याचं काम सुरु"- चंद्रकांत पाटील

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

Jalgaon News : जळगाव हादरलं! वाळूमाफियांची मुजोरी वाढली, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ८ वेळा हल्ले

SCROLL FOR NEXT