Murder esakal
पुणे

Chakan Crime : तरुणाचा कोयत्याने, कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे खून; दोघे आरोपी ताब्यात

बिरदवडी, ता. खेड येथील गावच्या हद्दीतील बैलगाडा शर्यतीच्या घाटात एका तरुणाचा कोयत्याने, कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला.

हरिदास कड

चाकण - बिरदवडी, ता. खेड येथील गावच्या हद्दीतील बैलगाडा शर्यतीच्या घाटात एका तरुणाचा कोयत्याने, कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

खून केल्यानंतर दोघे आरोपी पळून गेले होते. संबंधित संशयित आरोपींचा पोलीसांनी शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. ईश्वर पंडित पवार (वय -32, रा. बिरदवडी, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा खून जमिनीच्या मिळालेल्या पैशाच्या वादातून नात्यातील आरोपींनी केला आहे.

या खूनप्रकरणी संशयित आरोपी ओंकार काचोळे, हनुमंत नायकवाडी या दोघा तरुणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर हा त्याचा बैलगाडा घेऊन घाटामध्ये पळविण्यास गेला होता . त्यावेळी इतरही तरुण बैलगाडा पळविण्यासाठी घाटात आले होते. त्यावेळी दोघे आरोपी दुचाकीवरून आले होते. ईश्वर याच्यावर जवळच्या नात्यातील रोहकल, ता. खेड येथील दोघांनी कोयत्याने, कुऱ्हाडीने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने तो बेशुद्ध झाला. तो मृत पावल्याचे समजून आरोपी पळून गेले.

आरोपीनी कोणीही मध्ये पडू नये असा दम इतरांना भरला होता. जखमी झालेल्या ईश्वरला चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी -चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम व पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी गेले. रात्री उशिरा पंचनामा सुरु होता तसेच गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ईश्वर याच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, एक भाऊ, लहान मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तो इलेक्ट्रिक ची कामे करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT