zakir hussain 
पुणे

उस्ताद झाकीर हुसेन यांना एस डी बर्मन अवॉर्ड

सकाळवृत्तसेवा

पुणे - 15 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन व ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर, संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांना "एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव अवॉर्ड' जाहीर झाला आहे. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


अपर्णा सेन प्रतिथयश अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या असून त्यांना "पद्मश्री' पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. याशिवाय त्यांना चित्रपट क्षेत्रामधील राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार मिळाले आहेत. तीन कन्या (1961) या चित्रपटामधून पदार्पण करणाऱ्या सेन यांनी अपरिचितो या चित्रपटामधून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर 60, 70 व 80 च्या दशकांत बंगाली चित्रपट क्षेत्रांत त्यांनी विविध भूमिका साकारत दर्जेदार अभिनयाची छाप पाडली. याचबरोबर, 36 चौरंगी लेन या चित्रपटासाठी 1981 मध्ये त्यांना राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

महोत्सवाचे उद्घाटन येत्या 12 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता सिटी प्राइड (कोथरूड) चित्रपटगृहामध्ये होणार आहे. पिफचे हे 15 वर्ष "अधिक चित्रपट, अधिक विविधता, सखोलता आणि अधिक मनोरंजन करणारे असेल,' असा आशावाद पिफ संचालक व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बर पटेल यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई बॉम्बे बोलेगा 'खलिस्तान झिंदाबाद'! महापालिकेसह शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी

WhatsApp Update: 1 जानेवारी 2027 पासून WhatsApp, Snapchat, Telegram बंद होणार? SIM कार्डबाबत नवा नियम काय?

Marathi News Live Updates: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सहकुटुंब बजावला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क

Cancer Early Symptoms : शरीर देतंय हे गंभीर संकेत! कर्करोग होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'ही' 7 सुरुवातीची लक्षणे; वेळीच काळजी घ्या, अन्यथा...

Shiv Bhojan Scheme: शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्हींचा ‘वॉच! नवी नियमावली लागू; अनियमितता आढळल्यास केंद्रचालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT