Ashneer Grover Latest News  
Sakal Money

Ashneer Grover : 48 तासांत ते ट्विट डिलीट करा...अश्नीर ग्रोवर यांना हायकोर्टाचा दणका; जाणून घ्या प्रकरण

Ashneer Grover Latest News : भारत पे (BharatPe) चे माजी एमडी अश्नीर ग्रोवर यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे.

रोहित कणसे

Ashneer Grover Latest News : भारत पे (BharatPe) चे माजी एमडी अश्नीर ग्रोवर यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने अश्नीर ग्रोवर यांना ४८ तसांच्या आत भारत पे आणि एसपीआय चेरमन यांच्या विरोधात केलेले आपले ट्वीट डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत. अश्नीर ग्रोवर यांनी आपल्या पोस्ट मध्ये भारत पे आणि एसबीआय चेरमन विरोधात आक्षेपार्ह शब्दात पोस्ट केली होती.

आपल्या आदेशा दिल्ली हायकोर्टाने म्हटलं होतं की, अश्नीर ग्रोवर हे भारत पे च्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवू शकत नाहीत. तसेच एसबीआय चेअरमन यांच्या बद्दल केलेलं ट्वीट टाळता येण्याजोगे होते. हे ट्विट फक्त भारतपेचे चेअरपर्सन जे की एसबीआयचे माजी चेअरमन आहेत त्यांच्याबद्दल एक संकेत होता असेही कोर्टाने म्हटले आहे.

ट्विट मध्ये काय आहे?

सध्या इलेक्टोरल बाँडच्या प्रकररणात सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयविरोधात कठोर निर्णय दिला होता. यादरम्यान भारतपे (BharatPe) चे को फाउंजप अश्नीर ग्रोवर यांनी एसबीआयवर आपला राग व्यक्त केला आहे. ग्रोवर यांनी १२ मार्च २०२४ रोजी ट्विट केलं होतं की - एसबीआयचे अध्यक्ष हे लहान लोक असल्याचं दिसून येतं आणि मुळातच त्यांच्यात काहीतरी चुकीचे आहे. मी हे वाईट अनुभवातून शिकलो आणि आता हीच बाब सर्वोच्च न्यायालयाल देखील लक्षात आली आहे.

यापुर्वी अश्नीर ग्रोवर यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून भारत पे च्या शेअरहोल्डिंगची चोकशी सुरू करण्याची मागणी केली होती. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लिहीलेल्या पत्रात ग्रोवर यांनी भारतपे मध्ये भाविक कोलाडिया यांना कंपनीत पत आणून जाणीवपूर्वक केंद्रीय बँकेला धोकादिला असल्याचे म्हटले होते. कंपनीचे बोर्ड आणि गुंतवणूकदारांनी भाविक कोलाडिया यांना परत घेऊन येण्यासाठी त्यांचे शेअर्सना एका निश्चित काळासाठी स्टोरेज केले होते का याचा तपास करावा अशी मागणू देखील ग्रोवर यांनी केली होती.

२०२२ पासून एसबीआयचे माजी चेअरमन रजनीश कुमार आणि अश्नीर ग्रोवर यांच्यात वाद सुरू आहेत. तेव्हा ग्रोवर यांनी ट्विट करत रजनीश कुमार यांची भारतपे मध्ये हायरिंग सर्वात मोठी चूक होती असं म्हटलं होतं. रजनीश कुमार भारतपे च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर चेअरमन होते. यासोबतच ग्रोवर यांनी डेटामध्ये गोंधळ झाल्याबद्दल देखील अनेक गंभीर आरोप केले होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT