NPS Retirement Plan esakal
Sakal Money

NPS Retirement Plan : चाळीशी गाठली तरीही रिटायरमेंटचा प्लॅन तयार नाही? काळजी करू नका, अशी मिळवा महिन्याला 50 हजार रुपयांची पेन्शन

तुम्ही चाळीशीत असाल किंवा त्या आसपास असाल तर तुम्ही एक गोष्ट केल्याने तुम्हाला दर महिना पन्नास हजार रुपये इतकी पेन्शन मिळू शकते.

सकाळ डिजिटल टीम

NPS Retirement Plan : काही लोक पूर्ण प्लॅनिंग करून जगत असतात. करिअरची सुरुवात, सेटलमेंट, मुलांचे शिक्षण अन् त्यांची लग्न, रिटायरमेंट असे सर्व प्लॅनिंग ठरलेले असते. तर काही लोक कोणताही नियोजन न करता जगत असतात. रिटायरमेंट नंतर निवांत गावी जाऊन शेती करणे किंवा विरंगुळा म्हणून आवडती काम करणे सर्वांनाच आवडेल.

पण त्या काळातही काही लोकांना त्रास सहन करावा लागतो. कारण त्यांनी रिटायरमेंटचा कोणताही प्लॅनिंग केलेलं नसतं. तुम्ही चाळीशीत असाल किंवा त्या आसपास असाल तर तुम्ही एक गोष्ट केल्याने तुम्हाला दर महिना पन्नास हजार रुपये इतकी पेन्शन मिळू शकते.

जर व्यक्ती सरकारी नोकरदार असेल तर त्याला पेन्शन असते. पण सध्या सरकारी नोकरीची संधी फार मिळत नाही मग पेन्शन कशी मिळेल. तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर आजपासूनच एक गोष्ट करायला लागा. ज्यामुळे तुम्हालाही तुमच्या उतरत्या काळात कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये. तुम्हाला तुमच्या हक्काचे पन्नास हजार रुपये मिळू शकतात. कसे ते जाणून घेऊयात.

आम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलत आहोत ती आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System). ही पेन्शन सिस्टीम तुम्हाला तुमच्या कंपनीकडून नव्हे तर केंद्र सरकारकडून मिळत आहे. ज्या लोकांना रिटायरमेंटची काळजी स्वतः असते ते नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये गुंतवणूक करतात.

केंद्र सरकारची ही योजना शेअर मार्केटच्या रिटर्न वरती अवलंबून आहे. या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला योग्य रकमेत परतावा मिळतो. आणि तुमच्या जीवनभराची पेन्शनही तुम्हाला देतो.

 

या योजनेत कोणाला पैसे गुंतवता येतात?

नॅशनल पेन्शन योजना अंतर्गत कुठली भारताचा कुठलाही नागरिक या योजनेत पैसे गुंतवू शकतो. गुंतवणूकदाराचे वय 18 ते 70 या वयोगटात असावे. तुम्ही चाळीशीनंतर या योजनेत पैसे गुंतवतात असाल तर रिटायरमेंट वेळी तुम्हाला जमलेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम दिली जाते. तर 40% रक्कम ही तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात दर महिन्याला मिळते.

कशी मिळेल 50 हजाराची पेन्शन?

तुम्ही सध्या 40 वर्षाचे आहात आणि 60 व्या वर्षी निवृत्त होणार आहात. निवृत्तीवेळी तुम्हाला 50 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला चाळीसाव्या वर्षापासून या योजनेत दर महिन्याला 15 हजार रुपये गुंतवावे लागतील. ही पंधरा हजार रुपयाची रक्कम दर महिन्याला 25 वर्षांसाठी गुंतवावी लागेल. म्हणजे तुम्ही 25 वर्षात 45 लाख रुपये योजनेत गुंतवाल. या रकमेवरती दहा टक्के व्याज मिळते.

45 लाख रकमेवर 10% व्याज पकडले तर तुम्हाला 1,55, 68, 356 रुपये मिळतील. या हिशोबाने तुम्हाला 45 लाख अधिक 1,55, 68, 356 म्हणजेच 2,00,68,356 रुपयांची गुंतवणूक तयार होईल. याचे 60% म्हणजे 1,20, 41,000,१३ रुपये तुम्हाला एकरकमी मिळतील. तर 40% म्हणजे 80, 27, 342 दर महिन्याला पेन्शन स्वरूपात मिळतील.

या उर्वरित रक्कमेवरती आठ टक्के रिटर्न मिळतील असे गृहीत धरले तरी आपल्याला महिन्याला 53, 516 रुपये इतकी पेन्शन मिळू शकते. म्हणजेच ही फायद्याची स्कीम ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Political: सत्तेचा नवा अध्याय, की महायुती?; सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने दावा केल्याने वाढली रंगत; कोण कोणासोबत, याची उत्सुकता!

Latest Marathi News Update : मुंबई पालिकेच्या दुसऱ्या सभेत विरोधी नगरसेवक आक्रमक

Brain Activity After Death : मृत्यूनंतर ऐकू येतात 'हे' भयानक शब्द, डॉक्टरांच्या संशोधनात थक्क करणारी माहिती समोर

नव्या मालिकेची नवी सुरुवात! 'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका; सोबतीला आहेत हे कलाकार; प्रोमो व्हायरल

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

SCROLL FOR NEXT