Mukesh Ambani Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: अंबानींना मिळाला आणखी एक गुंतवणूकदार, 'या' कंपनीने केली 5,000 कोटींची गुंतवणूक

Mukesh Ambani: कंपनीने या कराराबाबत माहिती दिली

राहुल शेळके

Mukesh Ambani: अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरण (ADIA) कंपनीने रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये 4,966.80 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL Ltd) ने एक्सचेंज फाइलिंगमध्ये शेअर केली आहे. या डीलबाबत कंपनीकडून सांगण्यात आले की, या गुंतवणुकीअंतर्गत रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे ​​इक्विटी मूल्य 8.381 लाख कोटी रुपये झाले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, या गुंतवणुकीद्वारे अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीला कंपनीमध्ये 0.59 टक्के हिस्सा मिळेल. या मोठ्या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड इक्विटी मूल्याच्या बाबतीत देशातील टॉप-4 कंपन्यांमध्ये समावेश झाला आहे.

रिलायन्स रिटेलचे मूल्य तीन वर्षांत झाले दुप्पट

रिलायन्स रिटेल ही RIL च्या रिटेल व्यवसायाची मूळ कंपनी आहे. हे 18,500 हून अधिक स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे किराणा, इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशन आणि इतर विभागांमध्ये व्यवसाय करते. संचालक ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेल सतत आपला व्यवसाय वाढवत आहे आणि नवीन डील आणि गुंतवणूक मिळवत आहे.

यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये, कतार गुंतवणूक प्राधिकरणाने रिलायन्स रिटेलमध्ये 0.99 टक्के भागभांडवलासाठी 8,278 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर KKR कडून 2069.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आणि आता आणखी एक मोठी गुंतवणूक आली आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे.

KKR कडे रिलायन्स रिटेलमध्ये आधीच 1.17 टक्के हिस्सा आहे आणि आता नवीन गुंतवणुकीद्वारे ते कंपनीमध्ये आणखी 0.25 टक्के स्टेक घेणार आहे. यानंतर, KKR ची एकूण भागीदारी 1.42 टक्के होईल. 2020 च्या सुरुवातीला, जागतिक गुंतवणूक फर्मने रिलायन्स रिटेलमध्ये 5,550 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि त्यानंतर ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT