UPI Autopay Limit Sakal
Personal Finance

UPI Autopay Limit: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! UPI ऑटोपेची मर्यादा एक लाख पर्यंत वाढली

UPI Auto Payment Limit: तुम्ही UPIचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

राहुल शेळके

UPI Auto Payment Limit: तुम्ही UPIचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) UPI ऑटोपेची मर्यादा 15,000 रुपयांवरून 1 लाख रुपये केली आहे. मात्र ही सुविधा काही महत्त्वाच्या व्यवहारांसाठी आहे. म्युच्युअल फंडांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

"म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन, इन्शुरन्स प्रीमियम आणि क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसाठी ट्रान्झॅक्शनची मर्यादा 15,000 रुपयांवरून 1,00,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे," असे आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

RBI ने मंगळवारी UPI ऑटो पेची मर्यादा काही व्यवहारांसाठी 1 लाख रुपये केली आहे. आता ग्राहक मोबाईल बिल, वीज बिल, ईएमआय पेमेंट, मनोरंजन/ओटीटी सबस्क्रिप्शन, विमा आणि म्युच्युअल फंड यांसारखी पेमेंट सहजपणे करू शकतील.

आरबीआयने एक परिपत्रक जारी करून ही घोषणा केली आहे. त्यानुसार आतापर्यंत 15,000 रुपयांपेक्षा जास्त ऑटो पेमेंट व्यवहारांसाठी ओटीपी आवश्यक होता. आता तुम्ही कोणत्याही OTP शिवाय 1 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट सहज करू शकता.

UPI ऑटो पेमेंटचे फायदे

कोणत्याही अॅपचे सबस्क्रिप्शन घेत असताना आपण ऑटो पेमेंटला परवानगी देतो जेणेकरून पैसे आपोआप कापले जातील आणि कोणतीही अडचण येणार नाही. ते सुरू केल्यानंतर, तारीख लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठराविक कालावधीनंतर पेमेंट करण्‍यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

वेळेवर पैसे भरून तुम्ही दंड टाळू शकता. त्याच्या मदतीने हप्ते भरणे खूप सोपे होते. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला चेक किंवा रोख रकमेची गरज नाही किंवा तुम्हाला रांगेत उभे राहून वेळ वाया घालवावा लागणार नाही. UPI ऑटो पे सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT