Bank Holidays in July 2024 Sakal
Personal Finance

Bank Holiday July 2024: जुलैमध्ये इतके दिवस बँका राहतील बंद; पहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in July 2024: प्रत्येक महिन्याच्या अगोदर बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. त्यामुळे अनेक लोकांना त्यांचे बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी त्यांचे वेळापत्रक ठरवणे सोपे होते.

राहुल शेळके

Bank Holidays in July 2024: प्रत्येक महिन्याच्या अगोदर बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. त्यामुळे अनेक लोकांना त्यांचे बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी त्यांचे वेळापत्रक ठरवणे सोपे होते. बँकांच्या सुट्ट्या भारतीय रिझर्व्ह बँक ठरवते आणि त्यानंतर यादी जाहीर केली जाते. जुलै महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. या काळात विविध कार्यक्रमांमुळे बँकेला सुट्टी असेल.

शनिवार आणि रविवारचा समावेश

आरबीआयने रविवारी सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी दिली आहे हे तुम्हाला आधीच माहीत आहे. आठवड्यातून एक दिवस सुट्टी असण्याव्यतिरिक्त, बँका दुसऱ्या शनिवार आणि चौथ्या शनिवार बंद राहतात. या शिवाय बँकांना काही खास प्रसंगी सुट्ट्या असतात. जुलैमधील 12 दिवसांच्या बँक सुट्टीच्या यादीत दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.

जुलैमध्ये बँकेला कधी सुट्ट्या असतील?

  • शिलाँगमध्ये बुधवार, 3 जुलै 2024 रोजी बेह दिनखलामच्या निमित्ताने बँकेला सुट्टी असेल.

  • एमएचआयपी दिनानिमित्त शनिवार, 6 जुलै 2024 रोजी अजवालमध्ये बँकेला सुट्टी असेल.

  • रविवार, 7 जुलै 2024 रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे देशातील सर्व बँका बंद राहतील.

  • कांग (रथयात्रा) निमित्त सोमवार, 8 जुलै 2024 रोजी इंफाळमध्ये बँकेला सुट्टी असेल.

  • मंगळवार, 9 जुलै 2024 रोजी द्रुक्पा त्से-जी निमित्त गंगटोकमध्ये बँकेला सुट्टी असेल.

  • शनिवार, 13 जुलै 2024 रोजी दुसरा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.

  • रविवार, 14 जुलै 2024 रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे देशातील सर्व बँका बंद राहतील.

  • मंगळवार 16 जुलै 2024 रोजी डेहराडूनमध्ये हरेलाच्या निमित्ताने बँकेला सुट्टी असेल.

  • बुधवार, 17 जुलै 2024 रोजी मोहरमच्या निमित्ताने अनेक ठिकाणी बँका बंद राहतील. तिरुवनंतपुरम, इटानगर, गुवाहाटी, इम्फाळ, कोची, कोहिमा, गंगटोक, डेहराडून, अहमदाबाद, चंदीगड, पणजी आणि भुवनेश्वरमध्ये बँकांना सुट्टी असेल.

  • रविवार, 21 जुलै 2024 रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे देशातील सर्व बँका बंद राहतील.

  • शनिवार, 27 जुलै 2024 रोजी चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.

  • रविवार, 28 जुलै 2024 रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे देशातील सर्व बँका बंद राहतील.

बँका बंद असताना कोणती कामे करता येतात?

पैसे काढणे असो किंवा एखाद्याच्या खात्यात पैसे पाठवणे असो, अशा प्रकारे तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही बँकेशी संबंधित कामे एटीएम, नेट बँकिंग, ऑनलाइन बँकिंगद्वारे पूर्ण करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT