BYJU'S sakal
Personal Finance

BYJU'S : ‘बायजूज’च्या कर्मचाऱ्यांना वेतनाची रवींद्रन यांची ग्वाही

आर्थिक संकटात सापडलेल्या ‘बायजूज’ने कर्मचाऱ्यांना नुकतेच जानेवारी महिन्याचे वेतन दिले असून, कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत संस्थापक बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहून वेतनाची ग्वाही दिली असून, कठीण काळात दिलेल्या साथीबद्दल आभार मानले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : आर्थिक संकटात सापडलेल्या ‘बायजूज’ने कर्मचाऱ्यांना नुकतेच जानेवारी महिन्याचे वेतन दिले असून, कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत संस्थापक बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहून वेतनाची ग्वाही दिली असून, कठीण काळात दिलेल्या साथीबद्दल आभार मानले आहेत.

‘फेमा’ कायद्याच्या उल्लंघनासह अनेक प्रकरणामुळे ‘बायजूज’ची आर्थिक स्थिती खालावली आहे. ‘‘कंपनी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी मला गेले अनेक महिने अडचणींचे डोंगर पार करावे लागत आहेत.

यापुढच्या काळात हा संघर्ष आणखी वाढणार आहे. मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांचा पगार मिळेल, याची काळजी घेतली जाईल. तुमच्यापैकी अनेकांनी मला पगार मिळण्यास वेळ झाला, तरी हरकत नाही, असे कळवले आहे, कारण तुम्हाला मी कोणत्या संकटातून जात आहे, याची जाणीव आहे. हाच विश्‍वास मोलाचा आहे.’’ असे त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.

‘बायजूज’ कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा ७० कोटी रुपये खर्च करते. कंपनीवरील आर्थिक संकट दूर करण्याकरिता कंपनीचे संस्थापक व कुटुंबीयांनी आपले घरही गहाण ठेवले. येथे प्रत्येकाने काही ना काही त्याग केलेला असून, अनेकांनी न आवडणारे निर्णयही घेतले आहेत. या संकटांचा सामना करताना प्रत्येकजण काहीसा खचला असला, तरी कोणीही हार मानलेली नाही. आपण जे विश्व उभे केले आहे, त्याचा सर्वांना अभिमान आहे. हा विश्वास मला सर्व संकटाशी लढण्याचे बळ देत आहे, असेही रवींद्रन म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT