Chatha Foods IPO Sakal
Personal Finance

Chatha Foods IPO : 19 मार्चपासून चाथा फूड्सचा आयपीओ खुला होणार, अधिक जाणून घेऊ...

प्रोसेस्ड आणि फ्रोझन फूड कंपनी चाथा फूड्सचा ( Chatha Foods) आयपीओ 19 मार्चला उघडणार आहे. या आयपीओमधून 34 कोटी उभे करण्याचा कंपनीचा मानस आहे. या एसएमइ इश्यूमध्ये गुंतवणूकदार 21 मार्चपर्यंत बोली लावू शकतील.

सकाळ वृत्तसेवा

Chatha Foods IPO : प्रोसेस्ड आणि फ्रोझन फूड कंपनी चाथा फूड्सचा ( Chatha Foods) आयपीओ 19 मार्चला उघडणार आहे. या आयपीओमधून 34 कोटी उभे करण्याचा कंपनीचा मानस आहे. या एसएमइ इश्यूमध्ये गुंतवणूकदार 21 मार्चपर्यंत बोली लावू शकतील. कंपनी डोमिनोज, सबवे, बर्गर किंग यांसारख्या अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय चेन्सना प्रीमियम दर्जाच्या मांस उत्पादनांचा पुरवठा करते.

आयपीओ अंतर्गत 59.62 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. आयपीओ बंद झाल्यानंतर, 27 मार्च 2024 रोजी बीएसई एसएमईवर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग होऊ शकते. चाथा फूड्सचा आयपीओसाठी 53 ते 56 रुपये प्रति शेअर प्राइस बँड ठेवण्यात आला आहे. बिडिंगसाठी लॉट साइज 2000 शेअर्स आहे. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना किमान 1 लाख 12 हजार गुंतवावे लागतील.

आयपीओमधील 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी आहे. इंडओरिएंट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे.

रजिस्ट्रार स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत. तर मार्केट मेकर Alacity Securities आहे. सध्या चाथा फूड्समध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 81.36 टक्के आहे. कंपनीची सुरुवात 1999 मध्ये झाली होती. फ्रोझन आणि रेडी टू इट प्रोसेस्ड मीड उत्पादने बनवणाऱ्या आघाडीच्या भारतीय कंपन्यांपैकी हे आहे.

चाथा फूड्स लिमिटेडचा महसूल आर्थिक वर्ष 2023 मध्ये 34.14 टक्क्यांनी वाढून 117.24 कोटी झाला आणि निव्वळ नफा 264.66 टक्क्यांनी वाढून 2.45 कोटी झाला. एप्रिल-सप्टेंबर 2023 या कालावधीत कंपनीचा महसूल 70.78 कोटी आणि निव्वळ नफा 3.41 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT