DSK Case Sakal
Personal Finance

DSK Case: डी. एस.केंना मोठा धक्का! कंपनीच्या शेअरची किंमत होणार शून्य, गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार?

DSK Case: कंपनीचं अस्तित्व देखील संपणार आहे.

राहुल शेळके

DSK Case: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची जामिनावर सुटका झाली आहे. नऊ हजार गुंतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर डी एस कुलकर्णींच्या मालमत्ता विकत घेण्याचे प्रयत्न अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सुरु केले आहेत.

मात्र त्यातुन मिळणाऱ्या पैशातून सामान्य गुंतवणूकदारांची देणी भागवण्या ऐवजी कवडीमोल दराने डी एस केंच्या मालमत्ता घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून केला जात आहे. 

यातच आता मुंबईतील अंशदान प्रॉपर्टी लिमिटेड या कंपनीने डीएसकेडीएल कंपनीचा ताबा घेतला आहे. करारानुसार डीएसकेडीएल कंपनीचे शेअर्स शून्य होणार आहेत. 21 सप्टेंबर रोजी 2.50 कोटी शेअर्सची किंमत शून्य होणार आहे आणि कंपनीचं अस्तित्व देखील संपणार आहे. यामुळे शेअरधारकांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.

बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्यावर 28 ऑक्टोबर 2018 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एम.पी.आय.डी. कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. फसवणूक प्रकरणी या गुन्ह्यात डीएसके, त्यांच्या कुटुंबीयांना मार्च 2019 मध्ये अटक करण्यात आली होती.

असा केला घोटाळा

डीएसके यांनी तेजीच्या काळात आपल्या कंपनीद्वारे मुदत ठेवीही सुरू केल्या होत्या. गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद देत त्यांच्याकडे जवळजवळ 1हजार 115 कोटी रुपये गुंतवले.

हे पैसेही गुंतवणूकदारांना परत मिळालेले नाहीत. गृहनिर्माण प्रकल्प उभारणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तर तिथेही गुंतवणूकदार अडकले आहेत. लोकांना घरांचा ताबा मिळालेला नाही.

सगळ्याच बाजूने गुंतवणूकदारांचे हाल झाल्यावर त्यांनी एकत्र येऊन चौकशी सुरू केली. तेव्हा हा घोटाळा बाहेर आला होता. यासंबंधीचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रैलीच्या माध्यमातून जनजागृती

Asha Bhosle Passes Away: छातीतील इन्फेक्शनमुळे खरंच कार्डियॅक अरेस्ट येतो का? डॉक्टरांनी सांगितलं काय आहे कनेक्शन

फॅनच्या कृतीनं टीम डेव्हिड वैतागला, हातातला फोन घेतला अन्....; विमानतळावरील Video Viral

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

SCROLL FOR NEXT