Gautam Adani shares pics of world's largest green park project coming up in Gujarat  Sakal
Personal Finance

Adani Group: गौतम अदानी गुजरातमध्ये बनवणार जगातील सर्वात मोठा ग्रीन एनर्जी पार्क; फोटो शेअर करत दिली माहिती

Gautam Adani Shares Worlds Largest Green Park Pictures: ग्रीन एनर्जी पार्क अंतराळातूनही दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल शेळके

Gautam Adani Shares Worlds Largest Green Park Pictures: अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी गुरुवारी गुजरातमधील कच्छमध्ये बांधण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कचा फोटो शेअर केला आहे. ग्रीन पार्क प्रकल्पाविषयी माहिती देताना अदानी म्हणाले की, या प्रकल्पात 726 चौरस किलोमीटरचा मोठा परिसर आहे. त्यातून 30 GW वीजही निर्माण होणार आहे. हे अंतराळातूनही दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गौतम अदानी म्हणाले “ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा अभिमान वाटतो. आम्ही जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क बनवत आहोत. वाळवंटात 726 चौरस किमी व्यापलेला हा प्रकल्प अवकाशातूनही दिसतो. आम्ही 30GW वीज निर्माण करू. आम्ही 2 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणार आहोत.''

अदानी पुढे म्हणाले की, याशिवाय मुंद्रा येथून फक्त 150 किमी अंतरावर आम्ही सौर आणि पवन ऊर्जेसाठी जगातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादन करणारी इकोसिस्टम तयार करत आहोत. शाश्वत ऊर्जेच्या दिशेने भारताच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

अदानी समूहाच्या या प्रकल्पामुळे भारताची हरित ऊर्जा क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. 2021 मध्ये COP26 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता. 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करेल, असे ते म्हणाले होते.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ

दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून अदानी समूहाचे शेअर्स तेजीत आहेत. अदानी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : तीन तास बसूनही आमचा एफआयआर घेतला नाही - रोहित पवार

SCROLL FOR NEXT