Gold Rate Today  sakal
Personal Finance

Gold Rate Today : सोन्या-चांदीचे भाव गगनाला ; सोने ७३ हजारांपार, चांदी ८६,३०० रुपयांवर

सोने आणि चांदीचे भाव आता गगनाला भिडले असून, त्यांनी आज नवा उच्चांक गाठला आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात मोठी तेजी आल्याने आज नवी दिल्लीतील सराफा बाजारात सोने प्रति दहा ग्रॅम १०५० रुपयांनी वाढून ७३,३५० रुपयांवर गेले, तर चांदीचा भाव प्रति किलो १४०० रुपयांनी वाढून ८६,३०० रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सोने आणि चांदीचे भाव आता गगनाला भिडले असून, त्यांनी आज नवा उच्चांक गाठला आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात मोठी तेजी आल्याने आज नवी दिल्लीतील सराफा बाजारात सोने प्रति दहा ग्रॅम १०५० रुपयांनी वाढून ७३,३५० रुपयांवर गेले, तर चांदीचा भाव प्रति किलो १४०० रुपयांनी वाढून ८६,३०० रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले.

सोन्यातील या जोरदार तेजीमुळे मागणीवर परिणाम होत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. यंदाच्या गुढीपाडव्यालाही सोन्याच्या विक्रीवर विपरित परिणाम दिसून आला. पुणे सराफी बाजारपेठेत शुद्ध सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅममागे ७३,२०० रुपये होता, तर चांदीचा भाव प्रति किलो ८६,३०० रुपये होता.

जागतिक बाजारात, कॉमेक्सवर स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस ४८ डॉलरने वाढून २३८८ डॉलरवर गेला. चांदीचा भावही प्रति औंस २८.९५ डॉलरवर पोहोचला. मागील सत्रात तो २८.०५ डॉलर होता. दरम्यान, एमसीएक्सवरील फ्युचर्स ट्रेडमध्ये, इंट्रा-डे ट्रेडमध्ये सोन्याने प्रति दहा ग्रॅम ७२,८२८ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला. गेल्या महिनाभरात सोन्याच्या दरात सहा हजारांची वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांना लाभ

पाच ते २९ मार्च या २५ दिवसांच्या कालावधीत सोन्याच्या दरात सहा हजारांची वाढ, तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना एका महिन्यात चांगला मिळाला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चांदीचा दर ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

Bike tyre replacement : टू-व्हीलर गाडीचे टायर किती दिवसांनी बदलावेत? मोठं नुकसान होण्याआधीच जाणून घ्या

Mumbai News: बीएमसीची मोठी कारवाई! मुंबईतील ५० वर्ष जुन्या दर्ग्यावर बुलडोझर, व्हिडिओ व्हायरल

India Nepal Border Dispute : लिपुलेख-कालापानी वादात चीनची एन्ट्री? भारताने नेपाळला सुनावले; द्विपक्षीय यंत्रणा असताना तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही!

SCROLL FOR NEXT