G-20 sakal
Personal Finance

स्मार्ट माहिती : भारतीय शेअर बाजारातील ‘जी-२०’

‘जी २०’वरून भारतातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, अगोदरच भारावलेला भारतीय शेअर बाजार कसा गप्प बसेल? ‘सेन्सेक्स-निफ्टी’ने देखील आपले ‘जी २०’ शेअर पुढे केले आहेत.

गोपाळ गलगली

गेले दोन दिवस भारतातील वातावरण ‘जी २०’ने ढवळून निघाले. जगाच्या एकूण व्यापारापैकी ७५ टक्के व्यापार या ‘जी २०’ देशांतून होत असून, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या आणि विखुरलेले १८ देश आणि युरोपीय महासंघ यात येतात.

‘जी २०’वरून भारतातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, अगोदरच भारावलेला भारतीय शेअर बाजार कसा गप्प बसेल? ‘सेन्सेक्स-निफ्टी’ने देखील आपले ‘जी २०’ शेअर पुढे केले आहेत. कोणते आहेत हे ‘जी २०’ शेअर?

‘जी २० शेअर’साठी निकष

खरे म्हणजे ‘सेन्सेक्स-निफ्टी’मधील सर्वच ३०-५० शेअर उत्तमच आहेत. त्यातूनच ‘जी २०’ शेअर पुढील निकष लावून निवडले आहेत -

१) गेल्या तीन वर्षांचा परतावा (टक्के).

२) गेल्या तीन वर्षांतील विक्री आणि निव्वळ नफ्यातील वाढ (सीएजीआर).

३) धंद्यात गुंतविलेल्या एकूण मुद्दलावरील परतावा (आरओसीई).

४) वरीलप्रमाणे आलेल्या शेअरच्या टक्क्यांच्या बेरजेनुसार ‘जी २०’ची निवड.

सारांश

ही आकडेवाडी फक्त ‘सेन्सेक्स-निफ्टी’मधील शेअरशी निगडित आहे. ‘सेन्सेक्स-निफ्टी’बाहेरील शेअरदेखील उत्तम कामगिरी करीत आहेत.

शेअर बाजाराला उधाण आले आहे. जगातील परिस्थिती भारताला आशादायक बनू लागली आहे. मूलभूत सुधारणांनी आता वेग पकडलेला आहे. अशावेळी गुंतवणूकदारांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे.

मुदत ठेवीसारखी (एफडी) अल्प परतावा देणारी गुंतवणूक निदान काही प्रमाणात कमी करून त्याच बँकेचे शेअर घेऊन परतावा वाढवता येऊ शकतो. थोडा अभ्यास करून शेअर बाजार समजून घेतला पाहिजे. हीच वेळ आहे आपल्या आयुष्याच्या भविष्यकाळाची सोय करण्याची!

बघा, पटतेय का??

(लेखक ज्येष्ठ शेअर बाजारतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT