PM Modi Nashik Visit Sakal
Personal Finance

PM Modi Nashik: भारत जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये कसा आला? नाशिकमध्ये मोदींनी सांगितलं कारण

PM Modi Nashik Visit: स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत.

राहुल शेळके

PM Modi Nashik Visit: स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30,500 कोटींहून अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आज करणार आहेत. कार्यक्रमात तरुणांनी सांस्कृतिक नृत्य सादर केले. तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे.

हा दिवस त्या महापुरुषाला समर्पित आहे ज्यांनी गुलामगिरीच्या काळात भारताला नवीन ऊर्जा दिली. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त मी नाशिकमध्ये आहे हे माझे भाग्य आहे. मी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे भाषण करताना भारताला नव्या उंचीवर नेण्याचे काम युवकांनी करायचे आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थेत समाविष्ट झाली याचे कारण म्हणजे तरुणांनी शक्ती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हणले आहे.

युवाकांचा सेवाभाव देशाला उंचीवर घेऊन जाईल. सरकारनं 10 वर्षात तरुणांना विविध संधी दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तयार केली आहे. माझा तरुणांवर सर्वाधिक विश्वास आहे असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील तीर्थक्षेत्रे, मंदिरे स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबवावी. आज मला काळाराम मंदिराला भेट देण्याचे आणि मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचे सौभाग्य मिळाले आहे.

मी देशवासियांना विनंती करेन की, देशातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्याच्या शुभ मुहूर्तावर आपले श्रमदान करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT