Hunger Index Sakal
Personal Finance

Hunger Index: जागतिक भूक निर्देशांकात भारताची 111व्या क्रमांकावर घसरण; पाकिस्तानपेक्षाही भारताची स्थिती वाईट

Global Hunger Index 2023: जागतिक भूक निर्देशांक 2023 चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

राहुल शेळके

Global Hunger Index 2023: जागतिक भूक निर्देशांक 2023 चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये भारताची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बिकट झाली आहे. 125 देशांच्या या अहवालात भारत 111 व्या स्थानावर आला आहे. या अहवालानुसार बालकांच्या कुपोषणाची स्थितीही वाईट आहे. 2022 मध्ये भारत 107 व्या स्थानावर होता.

पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळही भारताच्या पुढे

12 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या या निर्देशांकात भारताचा स्कोअर 28.7 टक्के आहे, यावरून भूक आणि उपासमारीची परिस्थिती किती भीषण आहे हे दिसून येते. भूक निर्देशांक हे जागतिक, प्रादेशिक आणि देश पातळीवर भूक मोजण्याचे एक साधन आहे. निर्देशांकानुसार भारत आपल्या शेजारील देश श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशांच्याही मागे आहे.

त्याचबरोबर हे सर्व देश भारताच्या पुढे आहेत. यावेळच्या अहवालात श्रीलंका 60व्या, पाकिस्तान 102व्या, बांगलादेश 81व्या आणि नेपाळ 69व्या क्रमांकावर आहे. तर भारत 111 व्या स्थानावर आहे. निर्देशांकानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची स्थिती बिकट झाली आहे.

केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने गेल्या वर्षी आणि याही वर्षी म्हणजे सलग 2 वर्षे हा ग्लोबल हंगर इंडेक्स अहवाल पूर्णपणे नाकारला आहे. मंत्रालयाने म्हटले की जागतिक भूक मोजण्यासाठी केवळ मुलांवर लक्ष केंद्रित केलेल्या मेट्रिक्सचा वापर केला जाऊ नये.

मंत्रालयाने याला भूक मोजण्याची चुकीचा पद्धत आहे असे म्हटले होते. GHI 2022 बद्दल, मंत्रालयाने असेही म्हटले होते की भूक मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या 4 पद्धतींपैकी 3 फक्त मुलांच्या आरोग्यावर आधारित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT