india retail inflation rate eased to 5 10 percent in January national statistics  Sakal
Personal Finance

Retail Inflation : किरकोळ महागाईत घसरण; जानेवारीत दर ५.१० टक्क्यांवर

अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने जानेवारीमध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर ५.१० टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने जानेवारीमध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर ५.१० टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे. डिसेंबरमध्ये हा दर ५.६९ टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता, तर नोव्हेंबरमध्ये तो ५.५५ टक्के होता. ऑगस्ट २०२३ मध्ये महागाईने ६.८३ टक्क्यांचा उच्चांक गाठला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मुख्य व्याजदर सलग सहाव्यांदा ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महागाई दराची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२४मध्ये अन्नधान्याची किरकोळ महागाई ८.३ टक्के होती.

डिसेंबर २०२३ मधील ९.५३ टक्क्यांवरून ती खाली आली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ग्रामीण भागातील किरकोळ महागाई ६.६५ टक्के होती, तर शहरी महागाई ४.७९ टक्के होती. ग्रामीण महागाई जानेवारीमध्ये ५.३४ टक्के होती, तर डिसेंबरमध्ये ५.९३ टक्के होती. जानेवारी महिन्यात शहरी महागाईचा दर ४.९२ टक्क्यांवर घसरला आहे. जानेवारी २०२३ मध्ये तो ५.४६ टक्के होता.

पतधोरण समितीच्या नव्या वर्षातील पहिल्या आढाव्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली होती. जागतिक स्थितीमुळे अन्नधान्याच्या किमतींचा महागाईवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

भाज्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नजीकच्या काळात ग्राहक किंमत आधारित महागाई वाढू शकते. गहू, मसाले व कडधान्ये आदी पिकांसाठी रब्बी हंगामाच्या पेरणीच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे दास यानी नमूद केले होते.

रिझर्व्ह बँकेने २०२३-२४ साठी महागाई दराचा अंदाज ५.४ टक्के कायम ठेवला आहे. चालू तिमाहीसाठी महागाईदराचा अंदाज आधीच्या ५.२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला.

आर्थिक वर्ष २०२५ मधील पहिल्या तिमाहीत महागाई दर पाच टक्के, दुसऱ्या तिमाहीत चार टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.७ टक्के, तर एकूण महागाई दर ४.५ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT