Indias Employment Sees 9 percent Growth In April, Fueled By Production And Manufacturing  Sakal
Personal Finance

Job Opportunities: एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये 9 टक्के वाढ; 'या' क्षेत्रात सर्वाधिक संधी

Job Opportunities Growth in April: एप्रिलमध्ये वार्षिक आधारावर देशात नऊ टक्के नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. यावरुन असे दिसून येते की रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा होत आहे.

राहुल शेळके

Job Opportunities Growth in April: एप्रिलमध्ये वार्षिक आधारावर देशात नऊ टक्के नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. यावरुन असे दिसून येते की रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा होत आहे. एप्रिल महिन्यात, प्रामुख्याने उत्पादन, आरोग्यसेवा, रसायने आणि खते, अभियांत्रिकी, सिमेंट, बांधकाम आणि किरकोळ क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये सुधारणा झाली आहे.

FoundIt Insights Tracker (FIT) च्या मते, रिटेल, ऑटो, रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान आणि तेल/गॅस/पॉवर इंडस्ट्रीजमध्ये या महिन्यात नोकर भरतीमध्ये मध्यम वाढ झाली आहे.

फाउंडइटचे सीईओ शेखर गरिसा यांनी सांगितले की, स्टार्टअपमधील निम्म्याहून अधिक नोकरीच्या जाहिराती नवीन कर्मचाऱ्यांसाठी असतात. उत्पादन क्षेत्रात भरतीमध्ये 31 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. FoundIt इनसाइट्स ट्रॅकर (FIT) हे FoundIt द्वारे ऑनलाइन जॉब पोस्टिंगचे विश्लेषण करते.

भारताची स्टार्टअप इकोसिस्टम शहरांपलीकडे वेगाने विस्तारत असल्याचे यावरून दिसून येते. बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई अजूनही स्टार्टअपचे केंद्र आहे.

या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या झाल्या कमी

याउलट, कृषी-आधारित उद्योग, शिपिंग, ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) आणि पॅकेजिंग यांसारख्या क्षेत्रातील नोकर भरतीमध्ये वार्षिक आधारावर घट झाली आहे, अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिलमध्ये स्टार्टअप कंपन्यांची संख्या 37 टक्के वाढली आहे. या नवीन कंपन्यांमधील एकूण नोकऱ्यांची संख्या 14 टक्क्यांनी वाढली आहे.

आता बहुतांश स्टार्टअप्सनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा देणे बंद केले आहे. एप्रिल 2023 मध्ये आठ टक्के रोजगार संधींमध्ये घरून काम करण्याचा पर्याय देण्यात आला होता, तर गेल्या महिन्यात ही संख्या तीन टक्क्यांवर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

SCROLL FOR NEXT