2000 Rupees Notes Sakal
Personal Finance

2000 Rupees Notes: 2,000 रुपयांच्या नोटा आज होणार रद्दी? आजच जमा करा, RBI गव्हर्नर म्हणाले...

2000 Rupees Notes: जर तुमच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

राहुल शेळके

2000 Rupees Notes: जर तुमच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज बँकांमध्ये नोटा जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची शेवटची तारीख आहे. ही मुदत आज संपणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) हे काम पूर्ण करण्यासाठी आधी 30 सप्टेंबर 2023 ही अंतिम मुदत दिली होती, परंतु शेवटच्या क्षणी ती एका आठवड्याने वाढवण्यात आली.

काल आरबीआय गव्हर्नर यांनी रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची घोषणा करताना सांगितले की, आरबीआयकडे अद्याप 2,000 रुपयांच्या 12,000 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत.

म्हणजेच 2,000 रुपयांच्या एकूण नोटांपैकी केवळ 87 टक्के नोटा परत आल्या आहेत. 12,000 कोटी रुपयांच्या या नोटा अजूनही बाजारात शिल्लक असून त्या परत करण्याचा किंवा बदलून देण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की जर कोणाला 7 ऑक्टोबर 2023 नंतरही 2,000 रुपयांच्या नोटा जमा करायच्या किंवा बदलून घ्यायच्या असतील तर त्यांच्याकडे काही पर्याय आहेत.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, देशातील अनेक राज्यांमध्ये आरबीआयची ऑफिसेस आहेत जिथे या 2,000 रुपयांच्या नोटा जमा केल्या जाऊ शकतात. हे दोन प्रकारे करता येते.

पहिली पद्धत: सामान्य लोक आणि संस्था RBI च्या 19 कार्यालयांमध्ये जाऊन 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात किंवा जमा करू शकतात. या अंतर्गत, एक्सचेंजसाठी 20,000 रुपयांची मर्यादा आहे, म्हणजेच सामान्य लोक किंवा संस्था या 19 आरबीआय कार्यालयांमध्ये एकावेळी फक्त 20,000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात.

दुसरी पद्धत: 2000 रुपयांच्या नोटा भारतीय टपाल किंवा भारतीय टपाल विभागाद्वारे आरबीआय कार्यालयात पाठवल्या जाऊ शकतात. ही रक्कम फक्त भारतातील बँक खात्यात जमा केली जाऊ शकते.

नोट जमा करण्यासाठी काय करावे?

आरबीआयच्या नियमांनुसार या 2,000 रुपयांच्या नोटांसोबत ओळखपत्राची माहिती द्यावी लागेल. याशिवाय आरबीआयने काही सूचना दिल्या आहेत ज्यानुसार 2,000 रुपयांच्या नोटा आरबीआयच्या 19 ऑफिसमध्ये जमा करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT