LIC reclaims status of most-valued PSU, beating SBI with Rs 5.64-lakh-cr MCap  Sakal
Personal Finance

LIC MCap: एलआयसीने एसबीआयला टाकले मागे; बनली देशातील पहिली सर्वात मौल्यवान पीएसयू कंपनी

LIC MCap: आज सकाळपासून भारतीय आयुर्विमा महामंडळाचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर, त्याचे एम-कॅप 5.8 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. आज कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत आहेत.

राहुल शेळके

LIC MCap: आज सकाळपासून भारतीय आयुर्विमा महामंडळाचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर एम-कॅप 5.8 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. आज कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत आहेत. आज शेअर्स 919.45 रुपयांसह 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

शेअर्सच्या वाढीनंतर LIC आता PSUs (सार्वजनिक क्षेत्रातील) सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. आता LIC चे बाजार भांडवल स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पेक्षा जास्त आहे.

आज LIC चे शेअर्स वाढीसह 902.35 रुपयांवर व्यवहार करत आहेत. त्याच बरोबर एसबीआयचे शेअर्स कमी होऊन 624.40 रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या वर्षी, नोव्हेंबर 2023 मध्ये, एलआयसीच्या शेअरची किंमत 50 टक्क्यांहून अधिक वाढली होती. मार्च 2023 मध्ये लिस्ट झाल्यानंतर एलआयसीच्या शेअर्सवर दबाव होता.

मार्चमध्ये कंपनीच्या शेअरने प्रति शेअर 530 रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. मात्र, नोव्हेंबरपर्यंत कंपनीच्या शेअर्सनी 12.83 टक्के नफा कमावला.

गेल्या पाच दिवसांत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शेअर्समध्ये साडेसात टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच सरकारचा हिस्सा महिनाभरात सुमारे 13 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअर 45 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या या नेत्रदीपक वाढीमुळे LIC चे मार्केट कॅप देखील प्रचंड वाढले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT