New LPG rates Check the latest prices in Delhi and Mumbai  esakal
Personal Finance

LPG Price Hike: ग्राहकांना नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीच दणका, सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ; काय आहेत नवे दर?

LPG Price Hike: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे.

आशुतोष मसगौंडे

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे.

1 सप्टेंबरपासून मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 39 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

इंडियन आईलच्या वेबसाइटनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ 1 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. तर मुंबईत त्याची किंमत 1644 रुपये झाली आहे. यापूर्वी हा सिलिंडर मुंबईत 1605 रुपयांना मिळत होता.(LPG Price Hike)

याआधी ऑगस्टमध्ये एलपीजी गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यावेळी कंपन्यांनी 8.50 रुपयांनी वाढ केली होती, मात्र यावेळी त्यांनी थेट 39 रुपयांनी वाढ केली आहे. याआधी जुलैमध्ये कंपन्यांनी 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी केली होती.

कोलकात्यात या सिलिंडरची किंमत 1664.50 रुपयांवरून 1802.50 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये हे सिलिंडर आता 1855 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी चेन्नईमध्ये 19 किलोचा सिलेंडर 1817 रुपयांना विकला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT