Microsoft headquarters in focus as the company confirms the layoff of 9,000 employees worldwide, citing strategic restructuring.  Sakal
Personal Finance

Microsoft layoffs : 'मायक्रोसॉफ्ट'चा आणखी एक मोठा निर्णय ; आता तब्बल ९ हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार!

Microsoft job cuts : मे महिन्यात कंपनीने सहा हजार पेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. त्यानंतर जून महिन्यात ३०० कर्मचारी घरी गेले.

Mayur Ratnaparkhe

Microsoft Announces Major Layoffs in 2025 - जगातील दिग्गज टेक कंपनी म्हणून नावलौकीक असलेल्या मायक्रोसॉफ्टने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्यावतीने बुधवारी जाहीर करण्यात आले आहे की, जगभरातील कंपनी कार्यालयांमधून एकूण ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ४ टक्के पेक्षाही कमी आहे.

ही कपात विविध विभाग, भौगोलिक क्षेत्र आणि अनुभव पातळीवर केली जाणार आहे. याआधी मायक्रोसॉफ्टने सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णयही घेतला होता. मायक्रोसॉफ्ट साधारणपणे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस संघटनात्मक पुनर्चना करण्याच योजना आखत असते.

या पार्श्वभूमीवर कंपनीच्या एका प्रवक्त्याने ईमेलद्वारे म्हटले आहे की, आम्ही संघटनात्मक बदल लागू करत आहोत, जेणेकरून एका गतीशील बाजारात कंपनी आणि तिच्या टीमला यशासाठी उत्तम स्थितीत आणता येईल.

मायक्रोसॉफ्टने २०२५ वर्षात अनेकदा कर्मचारी कपात केलेली आहे. जानेवरीत कामगिरीच्या आधारावर कर्मचारी संख्येत १ टक्क्यापेक्षा कमी कपात केली गेली होती. तर मे महिन्यात कंपनीने सहा हजार पेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. त्यानंतर जून महिन्यात ३०० कर्मचारी घरी गेले.

जून २०२४पर्यंत मायक्रोसॉफ्टकडे २,२८,००० कर्मचारी कार्यरत होते. तर वर्ष २०२३मध्येही कंपनीने १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिलं होतं. मायक्रोसॉफ्टमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात ही २०१४मध्ये झाली होती. जेव्हा नोकियाचे डिव्हाइस आणि सर्व्हिस बिझनेसच्या अधिग्रहणानंतर तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT