Bank Of Badoda sakal
Personal Finance

Bank Of Baroda: नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड; बँक ऑफ बडोदाकडून जारी

सकाळ डिजिटल टीम

वन नेशन वन कार्ड मोहिमेनुसार बँक ऑफ बडोदा ने आज रुपे प्रीपेड नॅशनल कॉमन मोबिलिटी रुपे कार्ड जारी केले. हे कार्ड देशातील कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, टोलनाके, पार्किंग आणि शॉपिंग अशा सर्व बाबींसाठी वापरता येईल.

या रूपे कार्डामधील बॅलन्स संपला की तो पुन्हा भरता येईल. हे रुपे प्लॅटिनम प्रकारचे कॉन्टॅक्टलेस पद्धतीचे प्रीपेड कार्ड आहे. हे देशातील सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरता येऊ शकेल, अशी त्याची रचना आहे. मेट्रो, बस, गाड्या, कॅब, फेरीबोटी, टोलबुथ, पार्किंग लॉट, तसेच एटीएम मधून पैसे काढणे, दुकानात शॉपिंग करणे, ई-कॉमर्सवरून ऑर्डर देणे  अशा सर्व बाबींसाठी या कार्डवरून पेमेंट करता येईल. 

बँक ऑफ बडोदा च्या खातेदारांना तसेच बिगर खातेदारांनाही बँकेच्या शाखांमधून हे कार्ड मिळेल आणि ते लगेच सुरू केले जाईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड टर्मिनल वर हे कार्ड कोठेही वापरता येईल. यात एक लाख रुपये ऑनलाइनवॉलेट बॅलन्स ठेवता येईल. तर दोन हजार रुपये ऑफलाईन वॉलेट बॅलन्स ठेवता येईल, अशी माहिती बँक ऑफ बडोदा चे कार्यकारी संचालक लाल सिंह यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT