LIC New Plan Amrit Bal sakal
Personal Finance

LIC New Plan Amrit Bal : ‘एलआयसी’ची नवी अमृतबाल योजना दाखल

मुलांचे उच्च शिक्षण आणि इतर गरजांसाठी निधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने ‘अमृतबाल’ ही नवी आयुर्विमा योजना दाखल केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुलांचे उच्च शिक्षण आणि इतर गरजांसाठी निधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने ‘अमृतबाल’ ही नवी आयुर्विमा योजना दाखल केली आहे. ही योजना शनिवारपासून (ता. १७) ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध झाली.

या योजनेत किमान ३० दिवस आणि कमाल १३ वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या नावे गुंतवणूक सुरू करता येते. प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी प्रतिहजार ८० रुपये दराने परतावा जमा केला जातो. पॉलिसीची मुदत संपताना मुलाचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे आवश्यक आहे. प्रीमियम पेमेंटसाठी पाच, सहा किंवा सात वर्षांचे पर्याय उपलब्ध आहेत.

मर्यादित प्रीमियम पेमेंट पर्यायासाठी किमान मुदत १० वर्षे आहे, तर एकरकमी प्रीमियमसाठी किमान मुदत पाच वर्षे आहे. एकरकमी प्रीमियम भरल्यास पॉलिसीची कमाल मुदत २५ वर्षे आहे. किमान विमा रक्कम दोन लाख रुपये असून, कमाल रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही.

मुदतीनंतर मिळणारी रक्कम पाच, दहा आणि १५ वर्षांच्या हप्त्यांमध्ये घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या पॉलिसीवर कर्जाचीही सुविधा आहे. या योजनेत एजंटांच्या माध्यमातूनही गुंतवणूक करता येईल, असे ‘एलआयसी’ने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT