rbi governor shaktikanta das on EMI gdp loan banking Financial crisis Inflation business  Sakal
Personal Finance

RBI: EMIचा हप्ता आणि महागाईवर RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, व्याजदर...

RBI: आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दावोसमध्ये सांगितले की, आर्थिक आघाडीवर भारताची प्रगती चांगली झाली आहे. भारताने आर्थिक आव्हानांचा चांगला सामना केला आहे. आम्ही भू-राजकीय समस्या हाताळण्यास सक्षम आहोत.

राहुल शेळके

RBI: स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, आर्थिक आघाडीवर भारताची प्रगती चांगली झाली आहे. भारताने आर्थिक आव्हानांचा चांगला सामना केला आहे. आम्ही भू-राजकीय समस्या हाताळण्यास सक्षम आहोत.

गेली 4 वर्षे जगासमोर आव्हानांनी भरलेली आहेत. मात्र या सर्व आव्हानांवर मात करण्यात भारताने यश मिळवले आहे. महागाई आणि किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI प्रयत्न करत आहे. गेल्या 5 वर्षांत आर्थिक क्षेत्रात बरीच स्थिरता आली आहे. सध्या देशातील 75 टक्के उत्पादन क्षमतेचा वापर केला जात आहे.

आरबीआय गव्हर्नर पुढे म्हणाले की, किरकोळ महागाई 4 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. भारतात सध्या दर कपातीची शक्यता नाही. गेल्या 3 वर्षांपासून जीडीपी वाढ 7 टक्के आहे. व्याजदरात कपात हा सध्याच्या अजेंड्यावर नाही. जागतिक स्तरावर भारतावरील विश्वास वाढला आहे.

देशातील ठेवींची वाढ 12-13 टक्के

आरबीआय गव्हर्नर पुढे म्हणाले की, आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीडीपी वाढ 7 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. एनएसओचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीडीपी वाढ 7.4 टक्के राहील. पुढील वर्षीही ही वाढ कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील ठेवींची वाढ 12-13 टक्के झाली आहे.

असुरक्षित कर्जाबद्दल आरबीआय अलर्ट

शक्तीकांता दास पुढे म्हणाले की, आरबीआय असुरक्षित कर्जाबाबत जागरूक आहे. क्रेडिट इकोसिस्टमचे निरीक्षण केले जात आहे. यामध्ये अडचणींना तोंड देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. बँकांच्या कारभारात सुधारणा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: - नेस्को ड्रग्स प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT