RBI imposes monetary penalty on cooperative banks  Sakal
Personal Finance

RBI Action: आरबीआयचा सहकारी बँकांना दणका; 50 लाखांहून अधिकचा ठोठावला दंड

RBI Action on Banks: 18 जानेवारी 2024 रोजी रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना लाखोंचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे पाऊल उचलले आहे. ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे.

राहुल शेळके

RBI Action on Banks: 18 जानेवारी 2024 रोजी रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना लाखोंचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे पाऊल उचलले आहे.

ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरीक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेने नफ्यातून देणगी देताना आरबीआयचे नियम पाळले नाहीत.

याशिवाय कर्ज आणि अॅडव्हान्स देताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने गुजरातमधील मेहसाणा सहकारी बँकेला 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड आणि मेहसाणा नागरी सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने NKGSB सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, बँकेने चालू खाते उघडताना आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही आणि ग्राहकांना खात्यात व्यवहार करण्याची परवानगी दिली होती.

तपासानंतर, RBI ने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये बँकेने दिलेल्या स्पष्टीकरणावर RBI समाधानी न झाल्यास RBI ने NKGSB सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ज्या बँकांवर दंड आकारला जातो. तो फक्त बँकांना भरावा लागतो. यामध्ये खातेदारांना कोणताही दंड भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो. त्यामुळे या पाच बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT