RBI Action on 5 Co-Op Banks eSakal
Personal Finance

RBI Action : महाराष्ट्रातील पाच को-ऑपरेटिव्ह बँकांना आरबीआयचा दणका! लाखोंचा दंड, काय आहे कारण?

RBI Penalty : यामध्ये पुणे, सातारा आणि मुंबईमधील बँकांचा समावेश आहे.

Sudesh

भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील पाच को-ऑपरेटिव्ह बँकांवर मोठी कारवाई केली आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या बँकांना लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये पुणे, सातारा आणि मुंबईमधील बँकांचा समावेश आहे.

आरबीआयने कारवाई केलेल्या बँकांमध्ये इंदापुर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दि पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड, पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि पुणे नगर निगम सर्व्हेंट्स को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड या पाच बँकांचा समावेश आहे. या सर्व बँकांवर विविध कारणांमुळे कारवाई करण्यात आली आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कशामुळे झाली कारवाई?

इंदापूर को-ऑपरेटिव्ह बँकेला आरबीआयने पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. डिपॉझिट खाते आणि मिनिमम बॅलन्स मेन्टेन करण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील जनकल्याण सहकारी बँकेने क्रेडिट सूचनेच्या नियमांचं पालन केलं नसल्यामुळे या बँकेला देखील पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

साताऱ्यातील पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1949 च्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, या बँकेला दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर पुणे मर्चंट्स आणि पुणे नगर निगम सर्व्हेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकांना प्रत्येकी एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ग्राहकांवर काय होणार परिणाम?

आरबीआयने आपल्या आदेशात हे स्पष्ट केलं आहे, की या बँकांच्या कामकाजात ढवळाढवळ करण्याचा आपला उद्देश नाही. केवळ नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचा बँकेच्या इतर व्यवहारांवर किंवा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT