2000 Rupees Note Sakal
Personal Finance

RBI MPC Meeting: 500 रुपयांची नोट मागे घेणार? RBI गव्हर्नर यांनी स्पष्टच सांगितलं

19 मे रोजी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता.

राहुल शेळके

RBI MPC Meet Update: 19 मे रोजी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. तीन दिवसांनंतर, 23 मे, 2000 च्या नोटा बँकेत जमा किंवा बदलण्याची परवानगी देण्यात आली.

नोटा काढण्याची आकडेवारी जाहीर करताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की 23 मे पासून 50 टक्के नोटा परत आल्या आहेत. देशातील 2000 रुपयांच्या नोटांमधील रक्कम सुमारे 3.62 लाख कोटी रुपये आहे आणि यातील निम्मी रक्कम बँक प्रणालीत परत आली आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8 जून रोजी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर सांगितले की, आतापर्यंत सुमारे 1.8 लाख कोटी रुपयांच्या दोन हजार नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत.

मूल्याच्या बाबतीत, 31 मार्च 2023 पर्यंत चलनात असलेल्या नोटांच्या जवळपास निम्म्या आहेत. ते म्हणाले की 2,000 रुपयांच्या सुमारे 85 टक्के नोटा बँक खात्यांमध्ये जमा होत आहेत, जे आमच्या अपेक्षेनुसार आहे.

एकूण नोटांमध्ये 2000 च्या नोटांची संख्या 3.62 लाख कोटी:

जेव्हा RBI ने 2000 च्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला तेव्हाचा डेटा दर्शवितो की मार्च 2018 पर्यंत 6.73 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या.

एकूण नोटांमध्ये 2000 च्या नोटांचा वाटा 37.3% होता. 31 मार्च 2023 पर्यंत हा आकडा 3.62 लाख कोटींवर आला होता. यापैकी 1.8 लाख कोटी रुपये परत आले आहेत.

2000 ची नोट 30 सप्टेंबरपर्यंत व्यवहारांसाठी वैध असेल:

नोटा मागे घेण्याच्या निर्णयानंतर, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की ज्या लोकांकडे 2000 च्या नोटा आहेत ते 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत त्या बँकेत जमा करू शकतात किंवा इतर मूल्यांच्या नोटांसह बदलू शकतात.

या कालावधीत नोटा घेणे पूर्णपणे वैध आहे आणि कोणीही 2000 च्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही.

RBI 500 रुपयांच्या नोटा काढण्याचा किंवा 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत नाहीये. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांनी जनतेला अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. एमपीसीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT