RBI proposes stricter rules for housing finance companies  Sakal
Personal Finance

RBI: फक्त 5 वर्षांसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे जमा करता येणार, RBIने नियम केले कडक

RBI: आरबीआयने ठेवी घेणाऱ्या हाउसिंग फायनान्स कंपन्यांसाठी नियम कडक केले आहेत. या कंपन्या आता लोकांकडून फक्त पाच वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठीच ठेवी घेऊ शकणार आहेत. यापूर्वी हा नियम 10 वर्षांसाठी होता.

राहुल शेळके

RBI: आरबीआयने ठेवी घेणाऱ्या हाउसिंग फायनान्स कंपन्यांसाठी नियम कडक केले आहेत. या कंपन्या आता लोकांकडून फक्त पाच वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठीच ठेवी घेऊ शकणार आहेत. यापूर्वी हा नियम 10 वर्षांसाठी होता. याबाबत 29 फेब्रुवारीपर्यंत भागधारकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.

हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना मार्च 2025 पर्यंत (एचएफसी) त्यांची एकूण लिक्विड मालमत्ता, मंजूर सिक्युरिटीजसह सार्वजनिक ठेवींच्या 13 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल, असे आरबीआयने सोमवारी एका परिपत्रकात म्हटले आहे. एचएफसी इतर प्रकारच्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांप्रमाणेच ठेवी स्वीकारण्यासाठी समान नियमांचे पालन करतात.

चालू ठेव 60 महिन्यांत परत करावी लागेल

सध्याच्या ठेवी 60 महिन्यांच्या आत ग्राहकांना परत कराव्या लागतात. जर एचएफसीचे क्रेडिट रेटिंग कमी असेल तर ते नवीन ठेवी घेऊ शकणार नाहीत किंवा ठेवींचे नूतनीकरण करू शकणार नाहीत. RBI ला ऑगस्ट 2019 पासून HFC चे नियमन करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

RBI ने सोमवारी सुचवले की गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी (HFCs) लिस्ट नसलेल्या शेअर्समध्ये किती गुंतवणूक करावी हे ठरवावे.

1 एप्रिलपासून नवीन नियम

बँक किंवा NBFC कडून घेतलेले कर्ज चुकवल्यास दंडाशी संबंधित नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होतील. सोमवारी याबाबत माहिती देताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले की सुधारित कर्जाचे नियम लवकरच लागू केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT