Reserve Bank of India Sakal
Personal Finance

Reserve Bank of India : रिझर्व बँकेकडून चौथ्यांदा रेपोरेट जैसे थे

गेले दोन दिवस सुरू असलेल्या रिझर्व बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज याबाबतची माहिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - चलनवाढ चार टक्क्यांच्या आत आणण्यासाठी आणि त्याचबरोबर भारताचा विकासदर कायम राखण्यासाठी रिझर्व बँकेने आज सलग चौथ्यावेळी रेपो रेट आहे तोच म्हणजे साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवला. सप्टेंबर मध्ये ग्राहक निर्देशांक चलनवाढ किंचित घटेल असाही रिझर्व बँकेने अंदाज व्यक्त केला आहे.

गेले दोन दिवस सुरू असलेल्या रिझर्व बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज याबाबतची माहिती दिली. रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय समितीने पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेतल्याचेही ते म्हणाले. मे २०२२ पासून रिझर्व बँकेने रेपो दरवाढ सुरू करून फेब्रुवारी २०२३ पर्यंत तो दर साडेसहा टक्क्यांपर्यंत आणला होता. त्यानंतर हा दर कायम आहे.

या वर्षासाठी ग्राहक निर्देशांक चलनवाढ ५.४ टक्क्यांवर राहील तर पुढील वर्षाची चलनवाढ ४.५ टक्क्यांच्या मर्यादेत येईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. सप्टेंबर महिन्यात किरकोळ चलनवाढ ४.९ टक्क्यांवर येऊ शकते पण ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाही ती फारशी घसरणार नाही असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. सप्टेंबरला चलनवाढ कमी होणार असली तरी असमान पावसामुळे खरिपाच्या पेरणीत झालेली घट, तेलाचा कमी साठा आणि अन्न आणि ऊर्जा यांच्या जागतिक किमतीतील अस्थिरता यामुळे चलनवाढीचा अंदाज अस्थिर असल्याचे ते म्हणाले.

या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी साडेपाच ते साडेसहा टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान जीडीपी वाढीची अपेक्षा आहे तीच म्हणजे ६.५ टक्के ठेवण्यात आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ही वाढ ६ टक्क्यांच्या आसपास होईल. जानेवारी ते मार्च २०२४ दरम्यान जीडीपी ५.७ टक्क्यांनी वाढेल तर एप्रिल ते जून २०२४ दरम्यान जीडीपी ६.६ टक्के वाढेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वीच्या या अंदाजात कोणताही बदल करण्यात आला नाही.

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ग्राहक किंमत निर्देशांक चलनवाढ ६.४ टक्के होईल असा अंदाज आहे, आधी हा अंदाज ६.२ टक्के होता. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीतील चलनवाढीचा अंदाज ५.६ टक्के वर्तविण्यात आला आहे. तो आधी ५.७ टक्के होता. २०२४ च्या जानेवारी ते मार्च तसेच एप्रिल ते जून या दोन तिमाही दरम्यानचा चलनवाढीचा अंदाज तोच म्हणजे ५.२ टक्के ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT