Share Market Record Sakal
Personal Finance

Share Market Record High : शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही उच्चांकावर; काय आहे मार्केटची परिस्थिती?

आज व्यवहार सुरू होताना BSE सेन्सेक्स हे 289.93 अंकांनी वर जाऊन, 70,804 अंकांवर पोहोचलं होतं.

Sudesh

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील शेअर बाजारातील तेजी कायम राहिली. शुक्रवारी (15 डिसेंबर) शेअर मार्केट उघडताना सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी ऐतिहासिक उंचीवर पोहोचले. सेन्सेक्स आता 71 हजारांपासून काही अंतर दूर आहे.

आज व्यवहार सुरू होताना BSE सेन्सेक्स हे 289.93 अंकांनी वर जाऊन, 70,804 अंकांवर पोहोचलं होतं. तर NSE निफ्टी हे 104.75 अंकांनी वधारून 21,287 अंकांवर उघडलं.

सेन्सेक्स शेअर्स

सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स बाजार उघडताना तेजीत व्यवहार करत होते. टॉप गेनर्समध्ये JSW स्टील (1.76% वाढ) आणि इन्फोसिस (1.67% वाढ) हे दोन शेअर्स होते.

निफ्टी

निफ्टीचे 50 पैकी 40 शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. तर दहा शेअर्स हे रेड मार्कवर होते. टॉप गेनर्समध्ये इन्फोसिस, हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, युनायटेड फॉस्फरस आणि टाटा स्टील या कंपन्यांचा समावेश आहे.

बँक निफ्टी

बँक निफ्टीमध्ये ओपनिंगच्या वेळी तेजी दिसून आली. सुरुवातीला सर्व 12 शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. मात्र, अर्ध्या तासानंतर 4 शेअर्स रेड मार्कवर गेले. व्यवहार सुरू होताना 47,987 अंकांवर असणारं बँक निफ्टी लवकरच 48,000 अंकांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT