Tata Group IPO  sakal
Personal Finance

Tata Group IPO : टाटा समूहाचा आणखी एक आयपीओ येण्याची शक्यता ; इलेक्ट्रिक वाहन कंपनीची बाजारात नोंदणी होणार

टाटा समूह आपली इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. ची (टीपीईएमएल) शेअर बाजारात नोंदणी करण्याचा विचार करत आहे. या व्यवसायातील गुंतवणूकीतून कमाई करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : टाटा समूह आपली इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. ची (टीपीईएमएल) शेअर बाजारात नोंदणी करण्याचा विचार करत आहे. या व्यवसायातील गुंतवणूकीतून कमाई करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

येत्या १२ ते १८ महिन्यांत या कंपनीचा आयपीओ येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या द्वारे एक ते दोन अब्ज डॉलरचा निधी उभारण्याचा कंपनीची योजना असेल. टाटा मोटर्स ही उपकंपनी देशातील सर्वांत मोठी इलेक्ट्रिक वाहने उत्पादक कंपनी आहे.

ही कंपनी नेक्सॉन ईव्ही आणि टियागो ईव्हीसारख्या सर्वाधिक विक्रीच्या मोटारी बनवते. इलेक्ट्रिक मोटारींच्या बाजारपेठेत तिचा ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. या कंपनीमध्ये खासगी गुंतवणूक सर्वाधिक आहे.

जानेवारी २०२३ मध्ये अमेरिकेतील खासगी गुंतवणूकदार टीपीजीकडून एक अब्ज डॉलरचा निधी मिळवला आहे. वर्ष २०२६ पर्यंत दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीचे मूल्य ९.५ ते १० अब्ज डॉलर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

Raigad Protest: पालीत जंतरमंतर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन; विद्यार्थी समर्थनार्थ नागरिकांची मोठी एकजूट

Latest Marathi Update : पेपरफुटीप्रकरणी दोषींना लवकर शिक्षा होणार; फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा, निर्मला सीतारामन यांची माहिती

IND vs ZIM : इतिहास फक्त 16 धावा दूर; पण शून्यावर बाद झाला तर अभिषेकच्या नावावर नकोसा विक्रम

Pune News: हवेलीत धक्कादायक प्रकार! ‘मुळा-मुठा’वरील २४ कोटींचा पूल पहिल्याच पुरात कोसळला; पीएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह..

SCROLL FOR NEXT