Advani Hotels and Resorts (India) Ltd SAkal
Personal Finance

Bonus Share : 'या' होटॅल स्टॉकचा 1 वर्षात 111% परतावा, आता बोनस शेअरची घोषणा...

हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील कंपनी आडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडने (Advani Hotels and Resorts (India) Ltd) त्यांच्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील कंपनी आडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडने (Advani Hotels and Resorts (India) Ltd) त्यांच्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी करेल.

बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट 20 मार्च 2024 निश्चित करण्यात आल्याचे स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले. या रेकॉर्ड डेटपर्यंत आडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेडचे शेअर्स असणाऱ्या शेअरहोल्डर्सना 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक 1 शेअरसाठी समान फेस व्हॅल्यूचा 1 नवीन शेअर बोनस म्हणून मिळेल.

आडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेडचे शेअर्स सध्या 157.95 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 730 कोटी आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 111 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 4 वर्षात शेअरची किंमत 255 टक्क्यांनी वाढली आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 174.90 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 66.75 रुपये आहे.

बीएसई डेटानुसार, आर्थिक वर्ष 2024 च्या डिसेंबर तिमाहीत, कंपनीचा महसूल 32.29 कोटी होता आणि निव्वळ नफा 9.31 कोटी होता. डिसेंबर 2023 च्या अखेरीस, कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा 50.25 टक्के आणि पब्लिकचा 49.75 टक्के होता. कंपनीची स्थापना 1987 मध्ये झाली आणि तिचे मुख्यालय मुंबईत आहे. कॅरावेला बीच रिसॉर्ट गोवा हे आडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेडच्या मालकीचे आहे.

अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेडने या वर्षी जानेवारीमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 2 रुपये अंतरिम डिव्हिडेंड जाहीर केला होता. स्टॉकने 9 फेब्रुवारीला एक्स-डिव्हिडंडचा ट्रेड केला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT