Digitalization Sakal
Personal Finance

Digitalization : महिला उद्योजकांच्या मते डिजिटलायझेशन महत्त्वाचे; जागतिक उद्योजकता सर्वेक्षणातून माहिती समोर

भारतातील महिला उद्योजक डिजिटलायझेशनला लक्षणीय महत्त्व देत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील महिला उद्योजक डिजिटलायझेशनला लक्षणीय महत्त्व देत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘गोडॅडी’च्या जागतिक उद्योजकता सर्वेक्षणानुसार, ९७ टक्के महिला उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायामध्ये डिजिटलायझेशनमुळे कार्यपद्धतीत मोठी सुधारणा झाल्याचे सांगितले.

भारतात सर्वेक्षणात सहभागी महिलांपैकी ५१ टक्के या युवा उद्योजिका आहेत. एआय तंत्रज्ञानाचा व्यवसायाला फायदा होईल, असे मत ८८ टक्के उद्योजकांनी व्यक्त केले. भारतातील उद्योजकतेच्या भविष्याला नवा चेहरा देण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे, असे त्यांचे मत आहे.

८२ टक्के महिलांनी तीन ते पाच वर्षांत व्यवसायवृद्धीची अपेक्षा केली. ५७ टक्के महिलांनी बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचा मानस व्यक्त केला. ४७ टक्के उद्योजकांनी ग्राहकांसोबतचे संबंध दृढ करण्यावर लक्ष देणार असल्याचे सांगितले, तर ३८ टक्के महिलांनी सायबर सुरक्षा आणि डेटा सुरक्षा उपाययोजना वाढवण्यावर भर देणार असल्याचे म्‍हटले.

लघू उद्योगाचे स्वरूप बदलतेय

‘गोडॅडी’च्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विभागाच्या उपाध्यक्ष सेलिना बायबर म्हणाल्या, ‘‘डिजिटल तंत्रज्ञानामुळे लघू उद्योग क्षेत्राचे स्वरूप बदलत आहे. महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन क्षेत्रातही यश मिळवता यावे, यासाठी त्यांना सहज वापरता येतील अशी साधने उपलब्ध करण्यावर भर आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT