Zee-Sony Merger Sakal
Personal Finance

Zee-Sony Merger : ‘सोनी’ला राष्ट्रीय लवादाची नोटीस; ‘झी-सोनी’ विलीनीकरणप्रकरणी आंतरराष्ट्रीय लवादासमोर आज सुनावणी

‘झी-सोनी’ विलीनीकरण रद्द केल्याप्रकरणी झी एंटरटेनमेंटने सोनीविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया कंपनीला (कल्व्हर मॅक्स) तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘झी-सोनी’ विलीनीकरण रद्द केल्याप्रकरणी झी एंटरटेनमेंटने सोनीविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया कंपनीला (कल्व्हर मॅक्स) तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

‘एनसीएलटी’ने या प्रकरणावरील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या मुंबई खंडपीठाने झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसची भागधारक असलेल्या मॅड मेन फिल्म व्हेंचर्सने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस जारी केली आहे. मॅड मेन फिल्म व्हेंचर्सने ही याचिका दाखल करून झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लि. आणि सोनी दोघांनाही विलीनीकरणाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.

‘एनसीएलटी’ने ऑगस्ट २०२३ मध्ये या विलीनीकरणाला मान्यता दिली होती. गेल्या आठवड्यात, विलीनीकरणानंतर निर्माण होणाऱ्या कंपनीचे नेतृत्व कोण करणार यावरून दोन्ही कंपन्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने ‘सोनी’ने या विलीनीकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते.

तातडीची दखल

झी-सोनी विलीनीकरण रद्द झाल्याप्रकरणी सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवादासमोर बुधवारी (ता.३१) तातडीची सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. सोनी पिक्चर नेटवर्क इंडियाची मूळ जपानी कंपनी सोनी ग्रुप कार्पोरेशनने २२ जानेवारी रोजी, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लि.बरोबरचा १० अब्ज डॉलरचा विलीनीकरण करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली;

तसेच अटींचे उल्लंघन केल्याबद्दल ‘झी’कडे नऊ कोटी डॉलर टर्मिनेशन फीची मागणीही केली. याविरोधात झीने कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले. त्यावर सोनी ग्रुपने सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय लवादासमोर हे प्रकरण नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT