3 lakhs of 10 thousand in just one year now bonus shares announced Sakal
Share Market

Bonus Shares : केवळ एका वर्षात 10 हजारांचे 3 लाख, आता बोनस शेअर्सची घोषणा...

एका वर्षात तुमचे पैसे 3000 टक्क्यांनी वाढू शकतील यावर तुमचा विश्वास बसेल का ? म्हणजे तुमची 10 हजारांची गुंतवणूक केवळ एका वर्षात 3 लाखांमध्ये बदलली तर?आम्ही काल्पनिक कथा नाही सांगत आहोत, खरंच अशी घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Bonus Shares : एका वर्षात तुमचे पैसे 3000 टक्क्यांनी वाढू शकतील यावर तुमचा विश्वास बसेल का ? म्हणजे तुमची 10 हजारांची गुंतवणूक केवळ एका वर्षात 3 लाखांमध्ये बदलली तर?आम्ही काल्पनिक कथा नाही सांगत आहोत, खरंच अशी घटना घडली आहे.

एका शेअरने केवळ एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 2847 टक्के परतावा दिला आहे. हा स्टॉक केशर इंडियाचा (Kesar India) आहे. नागपूरमधील केसर इंडिया किंवा केसर लँड्स ही रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे.

हे 12 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. लिस्टिंगच्या दिवशी बीएसईवर त्याच्या शेअर्सची बंद किंमत 174 रुपये होती. तेव्हापासून शेअरची किंमत 2000 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

एक वर्षापूर्वी, 8 मार्च 2023 रोजी, बीएसईवर केसर इंडियाच्या शेअरची किंमत 126 रुपये होती. तर 8 मार्च 2024 रोजी ही किंमत 3713.15 रुपये आहे, एका वर्षात हा शेअर 2846.9 टक्क्यांनी वाढला आहे.

जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 50,000 रुपये गुंतवले असते तर त्याची गुंतवणूक 14.74 लाखापेक्षा जास्त झाली असती. जर एखाद्याने फक्त 20 हजारांची गुंतवणूक केली असती तर आज ही रक्कम सुमारे 6 लाख रुपये झाली असती.

केसर इंडियाने आपल्या शेअरहोल्डर्सना बोनस जारी करण्याची घोषणा केली आहे. 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचा 1 शेअरसाठी कंपनी त्याच फेस व्हॅल्यूचे 6 शेअर्स बोनस म्हणून देईल. यासाठी 19 मार्च 2024 ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली आहे.

या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असणाऱ्या शेअरहोल्डर्सना प्रत्येकी 1 शेअरमागे बोनस म्हणून 6 शेअर्स मिळतील. एप्रिल-सप्टेंबर 2023 या कालावधीत केसर इंडियाचे एकूण उत्पन्न 21.46 कोटी होते. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 6.5 कोटी नोंदवला गेला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT