bajaj finance stock price investment share market bse nse sensex Sakal
Share Market

Bajaj Finance : बजाज फायनान्स (शुक्रवारचा बंद भाव : रु. ८,१६८)

कंपनीला ‘बजाज फिनसर्व्ह’ या तिच्या पालक कंपनीकडून महत्त्वपूर्ण आर्थिक, व्यवस्थापकीय समर्थन मिळते.

सकाळ वृत्तसेवा

बजाज समूहातील एक महत्त्वाची कंपनी असलेली १९८७ मध्ये स्थापित, ‘बजाज फायनान्स’ ही ‘बजाज फिनसर्व्ह’ची उपकंपनी आहे. ही कंपनी ग्राहकाला छोट्या-मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा (कन्झ्युमर ड्युरेबल लोन), तसेच वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, तारण कर्ज, लघु व्यवसाय कर्ज, रोख्यांवर कर्ज, व्यावसायिक वित्त आणि ग्रामीण वित्तपुरवठा व्यवसायात कार्यरत आहे.

फायदेशीर वाढीचा इतिहास असल्याने ‘बजाज फायनान्स’ बजाज समूहासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची आहे. कंपनीला ‘बजाज फिनसर्व्ह’ या तिच्या पालक कंपनीकडून महत्त्वपूर्ण आर्थिक, व्यवस्थापकीय समर्थन मिळते. सध्या कंपनी १४०० हून अधिक शहरी आणि २४०० हून अधिक ग्रामीण कर्ज शाखाद्वारे आपला व्यवसाय चालवते. १.६ लाखांहून अधिक वितरण केंद्रांसह सुमारे ७ कोटी ६० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देते.

येत्या १७ ऑक्टोबरला कंपनीचे तिमाही निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. तिमाही निकालाच्या पूर्वी जाहीर झालेल्या माहितीनुसार, कंपनीने व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वार्षिक सुमारे ३३ टक्के, तर गेल्या तिमाहीच्या तुलनेत सात टक्के वाढ नोंदवली आहे.

व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढून अंदाजे २ लाख ९० हजार २०० कोटी रुपये झाली आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत एकत्रित निव्वळ तरलता अधिशेष अंदाजे ११ हजार ४०० कोटी रुपये आहे. कंपनीची तरलता स्थिती मजबूत आहे.

वार्षिक सुमारे ३९ टक्के वाढ नोंदवत ३० सप्टेंबरपर्यंत कंपनीकडील ठेवींचे पुस्तक अंदाजे ५४, ८०० कोटी रुपये झाले आहे. कंपनीने नुकतीच निधी वाढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे दीर्घकालीन वाढीच्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी कंपनी तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या दहा वर्षांत कंपनीने एकूण एनपीए अर्थात थकीत कर्जांचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा कमी ठेऊन भागधारकांना सरासरी १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत उत्तम व्यवसायवृद्धी केली आहे. व्यवस्थापनाखालील मालमत्तेत मजबूत वाढ, कार्यक्षम अंमलबजावणी, अनुभवी नेतृत्व संघ यामुळे कंपनी वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यास; तसेच मायक्रोफायनान्ससारख्या नव्या उपक्रमांमध्ये मालमत्ता जोखमीच्या व्यवस्थापनासाठी सक्षम असल्याचे संकेत मिळत आहेत.

दीर्घावधीच्या आलेखानुसार या कंपनीच्या शेअरने ऑक्टोबर २०२१ पासून ८,०५० ते ५,२२० या मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार केल्यावर गेल्या शुक्रवारी ८,१६८ रुपयांवर बंद भाव देऊन तेजीचे संकेत दिले आहेत. हा शेअर सध्या महाग वाटत असला, तरी व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता; तसेच जोखीमही लक्षात घेऊन दीर्घावधीसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT