Diwali Muhurat Trading 2023 Date, time and significance why Muhurat trading is so popular  Sakal
Share Market

Muhurat Trading 2023: मुहूर्त ट्रेडिंगसाठी तुम्ही तयार आहात का?

Muhurat Trading 2023: दिवाळीला शेअर बाजार बंद असला तरी संध्याकाळचा 1 तासाचा मुहूर्त (दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग) असतो.

राहुल शेळके

Muhurat Trading 2023: दिवाळी आता अगदी तोंडावर आली आहे. हा दिवाळीचा सण फक्त सर्वसामान्यांसाठीच खास नसून शेअर बाजारासाठीही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. दिवाळीला शेअर बाजार बंद असला तरी संध्याकाळचा 1 तासाचा मुहूर्त (दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग) असतो.

दिवाळीच्या निमित्ताने, मुहूर्त ट्रेडिंगसाठी 15 मिनिटांचे प्री-ओपनिंग सत्र संध्याकाळी 6 पासून सुरू होते. ट्रेडिंग 6.15 वाजता सुरू होते आणि 7.15 पर्यंत चालू राहते, त्यानंतर बाजार 7.25 पर्यंत स्थिरावतो. यंदाचे मुहुर्त ट्रेडींग 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपुजनाच्या दिवशी आहे.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

गुंतवणूकदार दिवाळीत केलेल्या खरेदीला शुभ मानतात. त्यामुळेच दिवाळीला बाजार बंद असतानाही केवळ शगुनच्या मुहूर्तावर लोक खरेदी करतात. मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या निमित्ताने अनेकांना नफा कमावण्याचा विचार असला, तरी बहुतांश लोकांचा भर केवळ शेअर्स खरेदीवर असतो.

जरी लोकांना बरेच शेअर्स विकत घ्यायचे नसले तरी ते शगुन म्हणून एक किंवा दोन शेअर्स खरेदी करतात आणि ते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवतात. या दिवशी शेअर्स खरेदी करणाऱ्यांना वर्षभर नफा मिळतो, असा व्यापारी वर्गाचा समज आहे.

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा नवीन नसून, ती सुमारे 5 दशकांपासून सुरू आहे. मुहूर्त ट्रेडिंग हे बीएसईमध्ये 1957 मध्ये सुरू झाले होते, तर एनएसईमध्ये ते 1992 मध्ये सुरू झाले. मुहूर्त ट्रेडिंग ही परंपरा म्हणून पाहिली जाते आणि प्रत्येक गुंतवणूकदार-व्यापारी या दिवशी आपले आवडते शेअर्स खरेदी करतात.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

SCROLL FOR NEXT