icc world cup sakal
Share Market

ICC World Cup 2023: वर्ल्डकप करणार मालामाल! 'या' कंपनीचा शेअर पाडणार पैशांचा पाऊस, तुमच्याकडे आहे का?

Lemon Tree Hotel Share: क्रिकेट वर्ल्ड कपमुळे अनेक कंपन्यांची कमाई वाढू शकते.

राहुल शेळके

Lemon Tree Hotel Share: चार वर्षांतून एकदा होणारा आयसीसी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 5 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होत असून, त्यातील अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. वर्ल्डकपमधील पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

हा वर्ल्ड कप देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचा ठरणार आहे. फेस्टिव्ह सीझन आणि क्रिकेट वर्ल्ड कपमुळे अनेक कंपन्यांची कमाई वाढू शकते. लेमन ट्री हॉटेल्स ही त्यापैकीच एक कंपनी. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

क्रिकेट वर्ल्ड कपमुळे हॉटेल व्यवसायाला अधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. लेमन ट्री हॉटेल्सनाही या वर्ल्ड कपकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कंपनीची विविध शहरांमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. अशा स्थितीत कंपनी या काळात चांगली कमाई करू शकते. या शेअरबद्दल तज्ज्ञ ही आशावादी आहे.

140 रुपयांपर्यंत भाव जाणार असल्याचा तज्ज्ञांना विश्वास

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, हेमांग जानी म्हणाल्या की, लेमन ट्री हॉटेल्सचे शेअर्स येत्या काळात 140 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. 2023 मध्ये या शेअर्सची किंमती 52 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी हा शेअर विकत घेतला आहे त्यांनी आतापर्यंत 52 टक्के नफा कमावला आहे.

लेमन ट्री हॉटेल्सचा 52 आठवड्यांचा उच्च दर 126.70 रुपये आहे. आणि 52 आठवड्यांचा नीचांक प्रति शेअर 70.25 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 9411.89 कोटी रुपये आहे. शुक्रवारी लेमन ट्री हॉटेल्सचा शेअर 0.76 टक्क्यांच्या वाढीसह 118.80 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT