Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज 'या' 10 शेअर्सच्या हालचालींवर ठेवा लक्ष, इंट्राडेमध्ये होईल कमाई

Share Market Investment Tips: बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजार तेजीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 271.50 अंकांच्या अर्थात 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 71,657.71 वर आणि निफ्टी 73.90 अंकांच्या म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 21,618.70 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजार तेजीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 271.50 अंकांच्या अर्थात 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 71,657.71 वर आणि निफ्टी 73.90 अंकांच्या म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 21,618.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीमध्ये बुधवारी खूप अस्थिर व्यवहार पाहायला मिळाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. वर आणि खाली दोन्ही ठिकाणी बरेच चढउतार होते.

व्यवहाराच्या शेवटी, निफ्टी सुमारे 74 अंकांनी वाढून हिरव्या रंगात बंद झाला. डेली चार्टनुसार निफ्टीने 21500 - 21460 चा सपोर्ट झोन कायम ठेवला आहे. फिबोनाची रिट्रेसमेंट लेव्हल आणि 20-डे मूव्हिंग एव्हरेजच्या (21489) रुपात महत्त्वाचा सपोर्ट आहे.

या महत्त्वाच्या सपोर्ट झोनजवळ निफ्टीमध्ये पुन्हा खरेदी दिसून आली. याशिवाय, आवर्ली मोमेंटम इंडिकेटरनेही पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर सुरू केला आहे जे चांगले संकेत आहेत. प्राइस आणि मोमेंटम दोन्ही इंडीकेटर्स तेजीचे संकेत देत आहेत. निफ्टीच्या वरच्या बाजूला पहिला रझिस्टंस 21730-21750 वर दिसून येतो. तर त्याचा पहिला सपोर्ट 21520-21500 वर दिसत आहे.

बँक निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली होती. मात्र, विक्रीचा फारसा दबाव नव्हता. अशात 46900-47000 च्या सपोर्ट झोनमधून खरेदी झाली आणि बँक निफ्टी हिरव्या रंगात बंद झाला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • सिप्ला (CIPLA)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : मुंबई पोलिसांची रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम; ३६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT