Investment Tips in marathi Which 10 shares perform today RELIANCE MARUTI BAJFINANCE 28 March 2024  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: बुधवारी बाजाराने हेवीवेट आणि ऑटो, रियल्टी, पॉवर आणि गुड्स शेअर्समधील खरेदीच्या आधारावर मागील सत्रातील तोटा भरुन काढला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 526.01 अंकांच्या अर्थात 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 72,996.31 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): बुधवारी बाजाराने हेवीवेट आणि ऑटो, रियल्टी, पॉवर आणि गुड्स शेअर्समधील खरेदीच्या आधारावर मागील सत्रातील तोटा भरुन काढला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 526.01 अंकांच्या अर्थात 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 72,996.31 वर आणि निफ्टी 119 अंकांच्या म्हणजेच 0.54 टक्क्यांच्या वाढीसह 22,123.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बुधवारी भारतीय शेअर्सची चांगली सुरुवात झाली आणि दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतशी बाजाराने गती पकडल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. पण दिवसअखेर निफ्टीमध्ये काहीशी अस्थिरता दिसली आणि 118.95 अंकांच्या वाढीसह 22,123.65 वर बंद झाला.

रिअल्टी आणि एनर्जी सेक्टर्स अव्वल राहिले तर पीएसयू बँका आणि आयटी दबावाखाली राहिले. बाजारातील प्रमुख निर्देशांक सकारात्मक सुरुवात करू शकतात. कारण गिफ्ट निफ्टी 22200 च्या जवळ व्यवहार करत आहे. जागतिक बाजारातही तेजी आहे.

निफ्टीने इनव्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केला आहे आणि आता तो 22,640 च्या लक्ष्यापर्यंत ब्रेकआउटची वाट पाहत आहे, तर खालच्या स्तरावर 21,900 ला सपोर्ट म्हणून पाहिले जात आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • रिलायन्स (RELIANCE)

  • मारुती (MARUTI)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • टायटन (TITAN)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT