L & T Technology Services sakal
Share Market

L&T Technology Services Ltd: एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (शुक्रवारचा बंद भावः रु. ५४७२)

कंपनीच्या ग्राहकवर्गामध्ये सध्या जागतिक फॉर्च्युन ५०० कंपन्यांपैकी ६९ कंपन्या; तसेच संशोधन आणि विकास विभागावर खर्च करणाऱ्या प्रमुख १०० कंपन्यांपैकी ५७ कंपन्यांचा समावेश आहे.

भूषण गोडबोले

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (एलटीटीएस) ही २०१२ मध्ये अंतर्भूत केलेली एक अभियांत्रिकी सेवा प्रदाता कंपनी आहे; जी औद्योगिक उत्पादने, वाहतूक, एरोस्पेस, दूरसंचार आणि प्रक्रियाउद्योग यासारख्या उद्योगांसाठी उत्पादन विकास मूल्य शृंखलांमध्ये नावीन्यपूर्ण डिझाइन आणि विकास उपायसेवा प्रदान करण्याचे कार्य करते.

ए. एम. नाईक हे कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर अमित चढ्ढा हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच व्यवस्थापकीय संचालक आहेत. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत, एल अँड टी अर्थात लार्सन अँड टुब्रो या पालक कंपनीकडे ‘एलटीटीएस’चे सुमारे ७३ टक्के शेअर होते.

कंपनीला लार्सन अँड टुब्रो या पालक कंपनीकडून मजबूत व्यवस्थापकीय; तसेच ऑपरेशनल समर्थन; त्याचप्रमाणे एल अँड टी या ब्रँडचादेखील लाभ मिळतो. मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करून तुलनात्मकदृष्ट्या कमी फायदा मिळणाऱ्या ‘कॅपिटल इंटेन्सिव्ह’ व्यवसायांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा यांसारख्या सेवा-आधारित व्यवसायांकडे एल अँड टी या पालक कंपनीचे धोरणात्मक लक्ष असल्याचे लक्षात येत आहे.

ग्राहकवर्गामध्ये प्रमुख कंपन्या

कंपनीच्या ग्राहकवर्गामध्ये सध्या जागतिक फॉर्च्युन ५०० कंपन्यांपैकी ६९ कंपन्या; तसेच संशोधन आणि विकास विभागावर खर्च करणाऱ्या प्रमुख १०० कंपन्यांपैकी ५७ कंपन्यांचा समावेश आहे. प्रमुख बाजारपेठेतील मोठ्या क्लायंट बेसमुळे कंपनीला अनेक व्यावसायिक करार जिंकण्यात मदत झाली आहे.

कंपनीची मूल्यवर्धित विभागातील विशिष्ट उपस्थिती; तसेच ऑटोमोटिव्ह (प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहने), वैद्यकीय उपकरणे, दूरसंचार, ५जी, प्रक्रिया अभियांत्रिकी आणि औद्योगिक ऑटोमेशन यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्याने आगामी काळात वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात वाढ होणे अपेक्षित आहे.

संशोधन आणि विकासावर सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे; तसेच नवे प्लॅटफॉर्म सोल्यूशन्स तयार केल्यामुळे, कंपनी विद्यमान ग्राहकांकडून मिळणाऱ्या व्यवसायात वाढ साध्य करण्यास; त्याचप्रमाणे नवे ग्राहक अधिग्रहण करण्यास सक्षम आहे.

महसुलात अमेरिकेचा वाटा मोठा

आथिर्क वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा ६२ टक्क्यांपेक्षा जास्त महसूल अमेरिकेमधून आला होता, जो आर्थिक वर्ष २०१८ मध्ये सुमारे ६० टक्के होता. कंपनीचे अमेरिकेवर जास्त व्यावसायिक अवलंबित्व आहे.

मात्र, अमेरिका ही जगातील सर्वांत मोठी तंत्रज्ञान बाजारपेठ आहे, जी जागतिक माहिती तंत्रज्ञान बाजारपेठेपैकी एक तृतीयांश बाजारपेठ आहे. कंपनीच्या महसुलात अमेरिकेचा वाटा ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

मात्र, ‘स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन’ (एसडब्लूसी) या कंपनीच्या संपादनामुळे महसूल विविधिकरणात सुधारणा झाल्या आहेत. कर्जाचे प्रमाण अत्यंत कमी ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने २५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत या कंपनीने व्यवसायवृद्धी केली आहे.

येत्या आठवड्यात १६ जानेवारीला कंपनीचे तिमाही निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. किमतीच्या दृष्टीने सध्या महाग वाटत असला, तरी दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, दीर्घावधीसाठी या कंपनीच्या शेअरमध्ये जोखीम मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमरः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT