LIC sold 3.73 crore shares of these 3 Adani group stocks in Q3  Sakal
Share Market

Adani Group: एलआयसीचा मोठा निर्णय! अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचे 3,72,78466 शेअर्स विकले

LIC Sell Adani Group Shares: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स विकले आहेत. LIC ने अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समधील हिस्सा कमी केला आहे.

राहुल शेळके

LIC Sell Adani Group Shares: अदानी समूहाच्या शेअर्सच्या वाढीदरम्यान एलआयसीने अदानी समूहाच्या 3 कंपन्यांमधील काही गुंतवणूक काढून नफा कमावला आहे. LIC ने अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समधील हिस्सा कमी केला आहे. एकूणच LIC ने या तिमाहीत तीन कंपन्यांचे 3,72,78466 शेअर्स विकले आहेत. LIC ही अदानी समुहाच्‍या सर्वात मोठ्या संस्‍थागत गुंतवणूकदारांपैकी एक आहे.

आकडेवारीनुसार, एलआयसीने डिसेंबरच्या तिमाहीत या तीन कंपन्यांचे एकूण 3.72 कोटी शेअर्स विकले आहेत. तर डिसेंबर तिमाहीत LIC ने अंबुजा सिमेंट्सचे 4,500 शेअर्स खरेदी केले आहेत. या मर्यादित खरेदीमुळे एलआयसीमधील कंपनीची हिस्सेदारी स्थिर राहिली आहे.

आकडेवारीनुसार, एलआयसीने डिसेंबर तिमाहीत अदानी एनर्जी सोल्युशन्समधील आपला हिस्सा 3.68 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. या तिमाहीत स्टॉक 42 टक्क्यांनी वाढला आहे.

अदानी एंटरप्रायझेसमधील एलआयसीचा हिस्सा डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस 3.93 टक्क्यांवर आला आहे, जो सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस 4.23 टक्के होता. तिसऱ्या तिमाहीत स्टॉक 29 टक्क्यांनी वाढला आहे.

एलआयसीने अदानी पोर्ट्समधील हिस्साही कमी केला आहे. डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस, कंपनीतील LIC चा हिस्सा 7.86 टक्क्यांवर आला आहे, जो दुसऱ्या तिमाहीत 9.07 टक्के होता. डिसेंबर तिमाहीत स्टॉक 46 टक्के वाढला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT