Share Market update Sakal
Share Market

Share Market Closing: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर बाजारात तेजी, सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Closing: आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम बाजारावर दिसत आहे.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 6 October 2023: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार वाढ झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम बाजारावर दिसत आहे. BSE सेन्सेक्सने 300 अंकांची उसळी घेत 65,900 चा टप्पा पार केला.

निफ्टीही 90 अंकांनी वाढून 19,630 च्या पातळीवर व्यवहार करत होता. बजाज फिनसर्व्हचे शेअर्स निफ्टीमध्ये सुमारे अडीच टक्क्यांनी वाढले आहेत. तर HUL सर्वाधिक तोट्यात आहे.

Share Market Closing 6 October 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये वाढ

सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 5.86% वाढ झाली आहे. यानंतर आज बजाज फायनान्स, टायटन, इंडसइंड बँक आणि आयटीसीचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्समध्ये उर्वरित 7 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल) चा शेअर 0.93 टक्क्यांनी घसरला. याशिवाय एशियन पेंट्स, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 6 ऑक्टोबर रोजी वाढून 319.84 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवारी, 5 ऑक्टोबर रोजी 317.84 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT