Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today M and M, Apollo Hospitals gain 3 per cent 9 November 2023  Esakal
Share Market

Share Market Closing: धनत्रयोदशीपूर्वी शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांचे 72,000 कोटी रुपयांचे नुकसान

Share Market Closing: सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह बंद झाले

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 9 November 2023:

धनत्रयोदशीपूर्वी बाजार घसरणीसह बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स 143 अंकांच्या घसरणीसह 64832 अंकांवर तर निफ्टी 19395 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले. महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रीड आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक वाढले. एचयूएल, टेक महिंद्रा आणि इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, बँकिंग, रिअल इस्टेट, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल, मीडिया, एनर्जी, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आज मिड कॅप शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर स्मॉल कॅप शेअर्समध्ये विक्री झाली आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 29 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चे शेअर्स सर्वाधिक 4.09 टक्क्यांनी वाढले. तर पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्सचे उर्वरित 17 शेअर्स आज लाल रंगात म्हणजेच घसरणीसह बंद झाले. यामध्येही हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे शेअर्स सर्वाधिक 1.56% घसरले. याशिवाय टेक महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि बजाज फायनान्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे 72,000 कोटी रुपये बुडाले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 9 नोव्हेंबर रोजी 319.78 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवार, 8 नोव्हेंबर रोजी 320.50 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 72,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 72,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT