Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातील घसरणीच्या काळात गुंतवणुकीची सुवर्णसंधी, 'या' शेअर्समध्ये करा गुंतवणूक

Share Market Tips: काल सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला तर निफ्टी जवळपास 200 अंकांनी घसरला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारी बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स तब्बल 600 अंकांनी घसरला तर निफ्टी जवळपास 200 अंकांनी घसरला. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 1 टक्क्यांनी घसरून बंद झाले. आयटी, एफएमसीजी आणि ऑटो शेअर्सवर दबाव दिसून आला.

सेन्सेक्स 610 अंकांनी घसरला आणि 65,508 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 193 अंकांनी घसरला आणि 19,524 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 287 अंकांनी घसरून 44,301 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव होता, त्यामुळे इंडेक्स खाली घसरल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. आता बँक निफ्टीसाठी, 45,000 वर स्थित 20-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजवर (20DMA) रझिस्टंस दिसून येतो आहे. तर खाली 44,200 वर सपोर्ट आहे. जर हा सपोर्ट तुटला तर बँक निफ्टी 43,800 पर्यंत आणखी घसरू शकतो.

निफ्टीमध्ये करेक्शन दिसून आल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टी 19,750 च्या वरची पातळी टिकवून ठेवू शकली नाही. बाजारात मंदीचा कल कायम आहे.

अशा परिस्थितीत, वाढ झाल्यास विक्रीचा सल्ला दिला जाईल असेही ते म्हणाले. पुढे निफ्टी 19250 पर्यंत घसरू शकतो. यासाठी 19450 वर सपोर्ट आहे. त्याच वेळी, 19600 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • एलटी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • विप्रो (WIPRO)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • ए यू बँक (AUBANK)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • आयडीएफसी बँक (IDFCFIRSTB)

  • ट्रेंट (TRENT)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT