KP Green IPO Sakal
Share Market

KP Green IPO : ‘केपी ग्रीन’ ठरला सर्वांत मोठा एसएमई आयपीओ

गुजरातच्या केपी ग्रीन इंजिनिअरिंग लि. या कंपनीने आणलेल्या १९० कोटींच्या एसएमई आयपीओमध्ये १३७ ते १४४ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून, त्यात १५ ते १९ मार्चदरम्यान गुंतवणूक करता येईल.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गुजरातच्या केपी ग्रीन इंजिनिअरिंग लि. या कंपनीने आणलेल्या १९० कोटींच्या एसएमई आयपीओमध्ये १३७ ते १४४ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून, त्यात १५ ते १९ मार्चदरम्यान गुंतवणूक करता येईल. यात किमान एक हजार शेअरसाठी व त्यापुढे एक हजार शेअरच्या पटीतच अर्ज करावा लागेल.

इशूमधील पन्नास टक्के शेअर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना तर पंधरा टक्के शेअर बड्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना आणि ३५ टक्के शेअर रिटेल गुंतवणूकदारांना मिळतील. हा इशू १९० कोटी ५० लाख रुपयांचा असून हा भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा एसएमई आयपीओ आहे.

यातील निधीतून कंपनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि विस्तारासाठी नवीन युनिट स्थापनेसाठी १५६ कोटी वापरले जातील. ही कंपनी के. पी. ग्रुपची प्रमुख कंपनी असून डॉ. फारुखभाई पटेल यांनी १९९४ मध्ये या कंपनीची स्थापना केली.

महसूल ११४ कोटींवर

गुजरातच्या केपी ग्रीन इंजिनिअरिंग लि. या कंपनीकडे स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून त्यांच्याकडे २३३ कोटींच्या ऑर्डर सध्या आहेत. मागील आर्थिक वर्षात त्यांनी साडेबारा कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. तो मागील वर्षीपेक्षा साडेचार कोटी रुपयांनी जास्त आहे. कंपनीचा महसूल ७७ कोटी रुपयांवरून मागील वर्षी ११४ कोटी रुपयांपर्यंत गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

एका क्षणात सगळं बदललं ! मधू कांबीकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, स्टेजवर नाचल्या, अन्...!

सारा तेंडुलकरच्या बर्थडे पार्टीत तिला घट्ट मिठी मारणारा तो तरुण कोण? वहिनी सानिका पाहतच राहिली; Video Viral

SCROLL FOR NEXT