Share Market Updates Sensex, Nifty open in the green, even as Asian peers trade mixed Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 200 अंकांनी वर, कोणते शेअर्स तेजीत?

Sensex-Nifty Today: बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांनी झेपावला आणि 72600 च्या पुढे व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 27 March 2024 (Marathi News): बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांनी झेपावला आणि 72600 च्या पुढे व्यवहार करत आहे.

निफ्टी देखील 22100 च्या जवळ चांगल्या वाढीसह व्यवहार करत आहे. मेटल, बँकिंग आणि रियल्टीसह ऑटो क्षेत्रात खरेदी होत आहे. तर एफएमसीजी क्षेत्रात विक्री होत आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

निफ्टी आयटी, निफ्टी बँक निर्देशांकांत वाढ झाली, तर निफ्टी फार्मा निर्देशांक आणि एफएमसीजी निर्देशांकात सुरुवातीला विक्रीचा दबाव होता. आज अदानी पोर्ट आणि रिलायन्समध्ये एक टक्का वाढीसह व्यवहार सुरू झाला. याशिवाय बीपीसीएल, अपोलो हॉस्पिटल, बजाज फायनान्समध्येही वाढ झाली आहे.

Sensex Today

कोणते शेअर्स वाढले?

सुरुवातीच्या व्यवहारात बहुतांश मोठ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते, तर 9 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.27 टक्के वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजही 1 टक्क्यांहून अधिक वाढला. दुसरीकडे, विप्रो सर्वात जास्त 0.53 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

Nifty Today

जागतिक बाजारात संमिश्र कल

जागतिक बाजारात संमिश्र कल दिसून येत आहे. मंगळवारी वॉल स्ट्रीटवर घसरण झाली. Dow Jones Industrial Average आणि S&P 500 मध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. डाऊ जोन्स 0.08 टक्क्यांनी घसरला, तर S&P 500 0.28 टक्क्यांनी घसरला. Nasdaq 0.42 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

S&P BSE SENSEX

आज आशियाई बाजारात काहीशी तेजी दिसत आहे. जपानचा निक्केई 0.24 टक्के आणि टॉपिक्स 0.4 टक्क्यांनी वधारला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.1 टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा हँग सेंगमध्ये घसरणीचे संकेत आहेत.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.62 लाख कोटींची वाढ

26 मार्च 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 3,82,57,436.76 कोटी होते. आज म्हणजेच 27 मार्च 2024 रोजी बाजार उघडताच ते 3,84,20,014.67 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,62,577.91 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आज शेअर बाजारात कोणते शेअर्स चर्चेत असणार?

  • CDSL: स्टँडर्ड चार्टर्डने आपला संपूर्ण 7.18% स्टेक ब्लॉक डीलद्वारे विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी किंमत रु. 1,672/शेअर अशी निश्चित करण्यात आली आहे.

  • पिरामल एंटरप्रायझेस: कंपनीने राइट्स इश्यू सबस्क्रिप्शनद्वारे पिरामल कॅपिटल आणि हाउसिंग फायनान्समध्ये 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

  • कोन एक: कंपनीने त्याच्या QIP साठी किंमत रु 2,555.01/शेअर निश्चित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Satara Politics: सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी काऊंटडाऊन सुरू; शासनाकडून २० मार्चपर्यंत मुदत, सत्तेच्या कोंडीमुळे वाढली उत्सुकता!

Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT