Share Market Updates Sensex, Nifty reach all-time highs, Sensex over 73,500, Nifty scales 22,300  Sakal
Share Market

Stock Market Record High: शेअर बाजारात तेजीचा उच्चांक; सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक शिखरावर

Stock Market At Record High: भारतीय शेअर बाजाराने एक नवा इतिहास रचला असून सेन्सेक्स-निफ्टीने सर्वकालीन उच्चांकाची विक्रमी पातळी गाठली आहे. BSE सेन्सेक्सने प्रथमच 73,000 चा टप्पा ओलांडला आहे आणि NSE निफ्टीने प्रथमच 22,300 चा उच्चांक गाठला आहे.

राहुल शेळके

Stock Market At Record High: भारतीय शेअर बाजाराने एक नवा इतिहास रचला असून सेन्सेक्स-निफ्टीने सर्वकालीन उच्चांकाची विक्रमी पातळी गाठली आहे. BSE सेन्सेक्सने प्रथमच 73,000 चा टप्पा ओलांडला आहे आणि NSE निफ्टीने प्रथमच 22,300 चा उच्चांक गाठला आहे. बँक निफ्टीने इंट्रा-डे 47,000 पार केला आहे. (Share Market Updates Sensex, Nifty reach all-time highs, Sensex over 73,500, Nifty scales 22,300)

निफ्टी आणि सेन्सेक्सचा नवीन विक्रमी उच्चांक

NSE निफ्टीने 22,312.65 ची नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे आणि पहिल्यांदाच निफ्टी 22,300 च्या वर गेला आहे. आज निफ्टीने 22,048.30 च्या पातळीवर सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्सनेही नवीन शिखर गाठले आहे आणि 73,590.58 या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. तो आज 72,606 वर सुरू झाला आणि सेन्सेक्सने इंट्राडे 1000 हून अधिक अंकांची वाढ झाली.

सेन्सेक्सचा नवीन विक्रमी उच्चांक

शेअर बाजारातील वाढीचे कारण काय?

  • बीएसई आणि एनएसई या दोन्ही निर्देशांकांवर टाटा स्टीलला सर्वाधिक फायदा झाला. BSE सेन्सेक्स 5.36 टक्क्यांच्या वाढीसह आणि NSE निफ्टी 5.50 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

  • शेअर बाजारातील वाढीचे कारण म्हणजे गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 8.4 टक्के आहे. शेअर बाजारात निफ्टी ऑटो, निफ्टी मेटल, पीएसयू बँक आणि तेल आणि गॅस निर्देशांकात वाढ झाली.

निफ्टी नवीन विक्रमी उच्चांक
  • अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीतील घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी यामुळे शेअर बाजारात वाढ झाली आहे. अमेरिकन सेंट्रल बँक, फेडरल रिझर्व्ह जूनमध्ये व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा आहे. शुक्रवारी सेन्सेक्सने 73574 चा नवा उच्चांक गाठला तर निफ्टीनेही प्रथमच 22300 चा स्तर गाठला.

  • शेअर बाजारात कंपन्यांचे मार्केट कॅप 3.3 लाख कोटी रुपयांनी वाढून 391.5 लाख कोटी रुपये झाले आहे. निफ्टी ऑटोमध्ये 1.02 टक्क्यांची चांगली वाढ झाली. निफ्टी मेटल, पीएसयू बँक आणि ऑइल अँड गॅसमध्येही एक टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे.

  • विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 30568 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 230 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. फेब्रुवारीमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 5160 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर डिसेंबरमध्ये त्यांनी 25,000 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

  • गेल्या 10 वर्षांत, मार्चमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी आठ वेळा खरेदी केली आहे. तर दोन वेळा विक्री केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT